व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरु आहे. अशामध्ये आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा जी व्यक्ती आपल्यावर जिवापाड प्रेम करते, त्या व्यक्तीसाठी आपला वेळ देणे तो बनता है ना बॉस! अशामध्ये जर तुम्ही मुंबई, नवी मुंबई किंवा ठाणे परिसरात राहत असाल तर तुम्ही नक्कीच 'या' काही ठिकाणांवर जाऊन आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.
व्हॅलेंटाईन आठवड्यात आपल्या पार्टनरला घडवा 'या' ठिकाणांची सफर. ( फोटो सौजन्य - Social Media )
नवी मुंबईतील उलवे येथे स्थित राम बाग तेथील सुंदर दृश्यांमुळे प्रसिद्ध आहे. निसर्गाची संपूर्ण किमया या बागेवर झालेली दिसते. तुमच्या प्रेमाचा सुंगंध आणखीन गोड करण्यासाठी या फुलांच्या दुनियेत नक्की या.
समुद्राची गार खारी हवा त्यात लाटांचा खळखळाट आणि तुमच्या दोघांच्या मनसोक्त गप्पा, आणखीन काय पाहिजे आयुष्यात? आपल्या पार्टनरसोबत सूर्यास्त पाहण्यासाठी उरण बीचला नक्की भेट द्या.
नवी मुंबईत नाही पण नवी मुंबईच्या जवळ असलेले सुंदर असे अभयारण्य म्हणजे कर्नाळा बर्ड सेंचुरी. याला कोकणाचा प्रवेशद्वारे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. या गोड दिवसांत निसर्गाची सफर करण्यासाठी येथे नक्की भेट द्या.
पनवेलमध्ये स्थित असलेले हे T Point निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले सुंदर असे ठिकाण आहे. तुमची तुमच्या सुंदर पार्टनरला घेऊन या आणि या सुंदर ठिकाणाची सफर घडवा.
ठाणे खाडीवर वसलेले ठाणे फ्लेमिंगो सेंचुरी पाहण्यासाठी दुरदुरून लोकं येत असतात. ऐरोली तसेच मुलुंडकडून या ठिकाणी जाण्याचे मार्ग आहेत.