निरोगी आरोग्यासाठी वयानुसार नियमित किती पाणी प्यावे?
जीवन जगण्यासाठी अन्न, पाणी, निवारा या मूलभूत गरजा आहेत. त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अन्नशिवाय पाणी पिऊन माणूस एकवीस दिवस जगू शकतो. पाणी शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. नियमित 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्याल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. शिवाय आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.पण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली तर अनेक आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. मानवी शरीरात 60 ते 70 टक्के पाणीच असते. शरीर सुधृढ आणि निरोगी राहण्यासाठी आहारात पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरातील प्रत्येक अवयवाला निरोगी राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. शरीरात असलेले पाणी प्रत्येक अवयवाचे रक्षण करते. शिवाय पाण्याचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. जेवण बनवणे, घरातील कामे करणे इत्यादी अनेक गोष्टींसाठी पाण्याचा वापर केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या वयानुसार शरीरातील पाण्याची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वयानुसार नियमित शरीराला पाण्याची किती आवश्यकता असते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
1 ते 3 वर्षे वयोगटातील मुलांनी नियमित 4 ते 5 कप पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्याल्यामुळे लहान मुलांच्या शरीराला पोषण मिळते आणि अनेक फायदे होतात. मुलांनी 800-1000 मिली पाणी पिणे आवश्यक आहे.
4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज 1200 मिली किंवा 5 कप पाणी पिणे आवश्यक आहे. शिवाय दैनंदिन आहारात पातळ पदार्थ, रस, फळांचा ज्युस इत्यादी गोष्टी पिण्यास द्याव्यात. यामुळे लहान मुलांच्या शरीराची निरोगी वाढ होईल.
निरोगी आरोग्यासाठी वयानुसार नियमित किती पाणी प्यावे?
9-13 वर्षे वयोगटातील मुलांनी नियमित 7 ते 8 कप पाणी पिणे आवश्यक आहे. शिवाय मुलांनी 1600-1900 मिली पिण्याची आवश्यकता असते. शरीराची वाढ होण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे.
निरोगी आरोग्य जगण्यासाठी आणि शरीराची वाढ होण्यासाठी 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनी नियमित 8-11 कप पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच मुलांनी नियमित 1900 ते 2600 मिली पाणी प्यायल्याचं पाहिजे.
19 ते 64 वर्षे वयोगटातील व्यक्तींनी नियमित 8 ते 11 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. या वयोगटातील व्यक्तींना पाण्याची जास्त आवश्यकता असते. शिवाय पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. कारण शरीराचे वजन आणि हवामान पाण्यावर अवलंबून असते.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनी नियमित 8-11 ग्लास किंवा 2000 ते 3000 मिली पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्याल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. वृद्धापकाळात शरीर डिहायड्रेट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन करावे.