Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मधुमेह आणि लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी! झायडस कंपनीकडून भारतात लाँच होणार सेमाग्लुटाइड इंजेक्शन

झायडस लाइफसायन्स लिमिटेड ही जागतिक पातळीवरील नामांकित औषधनिर्मिती कंपनी आहे. विविध दुर्धर आजारांवर नवनवीन संशोधन करुन उपाययोजना राबवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 05, 2026 | 11:00 AM
मधुमेह आणि लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी! झायडूस कंपनीकडून भारतात लाँच होणार सेमाग्लुटाइड इंजेक्शन

मधुमेह आणि लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी! झायडूस कंपनीकडून भारतात लाँच होणार सेमाग्लुटाइड इंजेक्शन

Follow Us
Follow Us:

मधुमेह वाढण्याची कारणे?
झायडस कंपनीकडून भारतात लाँच होणार सेमाग्लुटाइड इंजेक्शन

कंपनीने रुग्णांच्या सुविधेचा विचार करुन १५ मिलीग्राम /३ मिली हे अत्याधुनिक सेमाग्लुटाइड इंजेक्शन तयार केले आहे. यामध्ये प्री-फिल्ड कार्टिजसोबत पुन्हा वापरण्याजोगे पेन वापरले जाईल. या तंत्रज्ञानावर झायडसचे विशेष हक्क असून, वारंवार इंजेक्शन घेणा-या मधुमेही रुग्णांना आता वेदनेतून मुक्तता मिळेल. नवीन सेमाग्लुटाइड इंजेक्शन सेमाग्लिन , मशेमा, अल्टरमे या तीन वैशिष्ट्यपूर्ण नावांनी उपलब्ध करुन दिली जातील. पेटंटचा कालावधी संपताच हे औषध विक्रीसाठी उपलब्ध असेल.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणते पेय ठरतात प्रभावी? लिंबू पाणी की आवळा ज्यूस…

झायडस लाइफसायन्स लिमिटेड ही जागतिक पातळीवरील नामांकित औषधनिर्मिती कंपनी आहे. विविध दुर्धर आजारांवर नवनवीन संशोधन करुन उपाययोजना राबवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. झायडस आता देशात लवकरच सेमाग्लुटाइड हे इंजेक्शन लाँच करणार आहे. भारतात या औषधाचा पेटंट कालावधी संपल्यानंतर कंपनी हे इंजेक्शन सेमाग्लिन, मशेमा, अल्टरमे या तीन विविध ब्रँड नावांनी बाजारात उपलब्ध करुन देणार आहे. यापूर्वीच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कंपनीला या इंजेक्शनकरिता आवश्यक परवानगी दिली आहे. या परवानगी अंतर्गतच टाइप-२ मधुमेह आणि स्थूलता यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी या सेमाग्लुटाइड इंजेकश्नचे उत्पादन आणि विक्री केली जाईल. यामुळे मधुमेह आणि वजनाच्या समस्येशी लढणा-या रुग्णांना आता झायडससारख्या विश्वासार्ह कंपनीची प्रभावी उपचार पद्धती अंमलात आणता येईल.

कंपनीच्या सेमाग्लुटाइड उपचार पद्धतीत आधुनिक औषध-प्रदान प्रणाली वापरण्यात आली आहे. ही प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आली आहे. हीच कंपनीची या उपचारपद्धतीची सर्वात महत्त्वाची आणि वेगळी ओळख ठरली आहे. सध्या रुग्णांना त्यांच्या डोसच्या गरजेनुसार वेगवेगळ्या डोसची इंजेक्शन्स विकत घ्यावी लागतात. याला पर्याय म्हणून झायडूस लाइफसायन्स लिमिटेड कंपनी ही एक अभिनव आणि समायोजित करता येणारे सिंगल-पेन डिव्हाइस बाजारात आणणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना एकाच पेनमधून स्वतःच्या गरजेनुसार डोसची तीव्रता कमी-जास्त करुन टोचून घेणे सुलभ होणार आहे. या नाविन्यपूर्ण शोधामुळे रुग्णांना वारंवार इंजेक्शन घेण्याची कसरत करावी लागणार नाही. त्यांची सोय वाढेल आणि औषधोपचारांच्या खर्चात कपात होईल.

झायडस लाइफसायन्सेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शार्विल पटेल यांनी मधुमेहाच्या नव्या इंजेक्शनच्या निर्मितीबाबत कंपनीची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन झायडुसने हे इंजेक्शन तयार केले आहे. हे इंजेक्शन आमच्या नाविन्यपूर्ण संशोधनाचे आणि सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे. बाजारात महत्त्वाचे औषध उपलब्ध करुन उपचारांचा दर्जा वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. भारतात अशा प्रकारचे औषध वितरणाचे पहिलेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर केले जाणार आहे. यासह आम्ही उपचारपद्धती अधिक सुलभ आणि सोपी करणार आहोत. सुलभतेच्या या नव्या पावलामुळे रुग्णांना दीर्घकाळापर्यंत नियमितपणे उपचार घेणे सोपे जाईल. परिणामी, त्यांच्या आरोग्यात सुधारणा घडून येईल.’’

झायडस कंपनीकडे या अत्याधुनिक विशेष उपकरणाचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. हे उपकरण रुग्णांना टाइप-२ मधुमेह आणि स्थूलतेच्या उपचारांसाठी मंजूर असलेल्या सर्व कार्यक्षम मात्रा रुग्णांना देण्यासाठी उपयुक्त ठरेल. हे पेन पुन्हा वापरण्यायोग्य असल्याने रुग्णांना अत्यंत किफायतशीर ठरेल. या फेरवापराच्या सोयीमुळे रुग्णांवरील आर्थिक भार कमी होईल. परिणामी, अत्याधुनिक उपचार पद्धती आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यास मदत होईल. सध्या देशात मधुमेह आणि स्थूलतेने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जीएलपी-१ वर आधारित उपचार पद्धती अत्यंत प्रभावी ठरु शकते. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या आकडेवारीनुसार, भारतात तब्बल ८.९ कोटी प्रौढ वयोगटातील रुग्ण मधुमेहबाधित आहेत. प्रौढ लोकसंख्येपैकी १०.५ टक्के लोकांना या आजाराचा सामना करावा लागत आहे.

health Care Tips: स्थूलतेमुळे वंध्यत्वाची समस्या गंभीर! संतती सुखप्राप्तीसाठी प्रोजेनेसिसमध्ये उचित मार्गदर्शन उपलब्ध

गेल्या काही वर्षांत प्रौढ महिलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण ९१ टक्क्यांनी (१२.६ टक्क्यांवरुन थेट २४ टक्क्यांपर्यंत) वाढले. पुरुषांमधील हे प्रमाण १४६ टक्क्यांनी (९.३ टक्क्यांवरुन थेट २२.९ टक्क्यांपर्यंत) वाढले. सर्व वयोगटात स्थूलतेचे रुग्ण वाढले आहे. मधुमेह आणि स्थूलतेचे वाढते रुग्ण हे आरोग्य व्यवस्थेसमोरील राष्ट्रीय संकट ठरले आहे.

Web Title: Good news for diabetes and obesity patients semaglutide injection to be launched in india by zydus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • obesity

संबंधित बातम्या

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन
1

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा
2

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल
3

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल

स्वयंपाकघरातील ‘सोनं’ ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे
4

स्वयंपाकघरातील ‘सोनं’ ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.