
५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा 'हे' खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
अशाप्रकारे तयार करा लिक्विड
यासाठी सर्वप्रथम एक भांड घ्या आणि त्यात एक चमचा मीठ, तीन चमचे सायट्रिक ऍसिड किंवा लिंबाची साल, किंवा तीन चमचे लिंबाचा रस आणि तीन चमचे पांढरा व्हिनेगर घाला. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा आणि नंतर त्यात थोडे पाणी घालून लिक्विड तयार करा.
कांस्य, तांबे आणि पितळेची भांडी होती क्लिन
घरात तयार केलेल्या या लिक्विडच्या मदतीने तुम्ही कांस्य, तांबे आणि पितळेची भांडी सहज क्लिन करु शकता. मुख्य म्हणजे या लिक्विडच्या मदतीने भांडे साफ करण्यासाठी तुम्हाला फार जास्त मेहनत करण्याची गरज भासणार नाही. भांडी साफ करण्यासाठी तयार लिक्विड भांड्यावर ओता आणि स्क्राॅचच्या मदतीने भांडी हलक्या हाताने घासा. काही मिनिटे भांड्यांना चांगलं रगडल्यानंतर तुम्हाला दिसेल की, भांड्यांवरचा काळा थर सहज दूर झाला आहे. यानंतर पाण्याने भांडी स्वच्छ धुवून काढा आणि मग कापडाने भांड्यांना पुसून देवपूजेत त्यांचा वापर करा.
Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
मूर्ति साफ करण्यासाठी कशाचा वापर सर्वाेत्तम ठरेल?
जर तुम्हाला देवाची मूर्ती साफ करुन चमकवायची असेल तर यासाठी पितांबरी पावडरचा वापर फायदेशीर ठरेल. तुम्ही यात दही आणि आमचूर पावडर मिक्स करुन त्यात थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करु शकता. या पेस्टने मूर्ती चांगली हाताने घासा आणि मग पाण्याने धुवून याची चमक पाहा.