Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रागावर ठेवा नियंत्रण! नात्यांना संपवणाऱ्या या भावनेला मनातून कायमचं असं संपवा

जीवनात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात; काही सकारात्मक तर काही संयमाची परीक्षा पाहणारी असतात. अशा अवघड लोकांशी वागताना स्वतःची मानसिक शांतता टिकवणं सर्वात महत्त्वाचं आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 10, 2026 | 09:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जीवनाच्या प्रवासात आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटत असतात. काही लोक मनमोकळे, सहकार्य करणारे आणि सकारात्मक असतात, तर काही जण आपला संयम आणि सहनशक्ती अक्षरशः तपासून पाहतात. अशा “अवघड” माणसांशी रोजच्या आयुष्यात वागणं मानसिकदृष्ट्या थकवणारं ठरू शकतं. कधी ऑफिसमधील सतत दबाव टाकणारा सहकारी, कधी प्रत्येक गोष्टीत दोष काढणारा नातेवाईक, तर कधी कायम नकारात्मक बोलणारा ओळखीचा अशा लोकांशी सामना करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची मानसिक शांतता टिकवून ठेवणं. मानसशास्त्र सांगतं की आपण इतरांना बदलू शकत नाही, पण स्वतःची प्रतिक्रिया मात्र नक्कीच नियंत्रित करू शकतो. जर तुम्हीही अशा लोकांमुळे त्रस्त असाल, तर खाली दिलेल्या मानसशास्त्राधारित टिप्स नक्की उपयोगी ठरतील.

नायरमधील बंद कॅथलॅब पुन्हा सुरू होणार, लॅब बंद असल्यामुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांवर आर्थिक बोजा

मनावर ओझं असताना योग्य व्यक्तीशी संवाद साधणं खूप दिलासा देणारं असतं. चुकीच्या माणसाशी तक्रार केल्यास चिडचिड आणि राग अधिक वाढतो, पण विश्वासू मित्र, मैत्रीण किंवा कुटुंबातील व्यक्ती तुमचं म्हणणं समजून घेते आणि वेगळा दृष्टिकोनही देते. संशोधनानुसार, भावना व्यक्त केल्याने शरीरातील तणाव वाढवणाऱ्या ‘कॉर्टिसोल’ हार्मोनचं प्रमाण २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. हे मन साफ करण्यासारखं असतं. मात्र, उगाच गॉसिप टाळा आणि अशाच लोकांशी बोला जे तुम्हाला हसवतील, समजून घेतील किंवा उपाय सुचवतील.

बहुतेक वेळा अवघड लोकांच्या वागण्यात एक ठरलेला पॅटर्न असतो. कुणी कायम टोमणे मारतो, कुणी प्रत्येक गोष्टीत तक्रार करतो, तर कुणी कारण नसताना रागावतो. हा पॅटर्न ओळखला, की आपण मानसिकदृष्ट्या आधीच तयार राहतो. समोरचा कसा वागेल याची कल्पना असल्यामुळे अचानक धक्का बसत नाही आणि आपण कमी प्रतिक्रिया देतो. मानसशास्त्रानुसार, यामुळे मेंदूतील ‘अ‍ॅमिग्डाला’ (भावनिक प्रतिक्रिया नियंत्रित करणारा भाग) शांत राहतो आणि आपण अधिक संतुलित निर्णय घेऊ शकतो.

कोणी कटू शब्दांत बोललं किंवा टोमणा मारला, तरी लगेच उत्तर देण्याची गरज नसते. एक खोल श्वास घ्या, काही क्षण थांबा आणि मग शांतपणे उत्तर द्या. तात्काळ प्रतिक्रिया देणं ही भावनेच्या भरात घेतलेली कृती असते, तर विचार करून दिलेला प्रतिसाद ही समजूतदारपणाची खूण आहे. कधी कधी गप्प राहणं ही कमजोरी नसून एक चतुर रणनीती असते. समोरचा ओरडत असेल आणि तुम्ही शांत आवाजात बोललात, तर परिस्थिती हळूहळू निवळते. मानसशास्त्रात याला ‘इमोशनल कॉन्टेजन’ म्हटलं जातं—म्हणजे लोक नकळत समोरच्याच्या भावनिक पातळीशी जुळवून घेतात.

सावधान! लठ्ठपणा शरीरच नाही तर पोखरतोय मेंदू, AIIMS चा धक्कादायक अहवाल, Ramdev Baba चा घरगुती उपाय

हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की तुम्ही कुणाचे थेरपिस्ट नाहीत. इतरांचा राग, तणाव किंवा निराशा दूर करणं हे तुमचं काम नाही. एखादी व्यक्ती चिडलेली किंवा नकारात्मक वागत असेल, तर ती त्यांची समस्या आहे, तुमची नाही. तुम्ही फक्त तुमच्या प्रतिक्रिया आणि मनःशांतीकडे लक्ष द्या. गरज असेल तर मर्यादा आखा, थोडं मागे सरका आणि समोरच्या व्यक्तीला स्वतः सावरायला वेळ द्या.

शेवटी, अवघड माणसांशी वागण्याचं गमक त्यांना बदलण्यात नाही, तर स्वतःला संतुलित ठेवण्यात आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक शांततेला प्राधान्य देता, तेव्हा बाहेरील नकारात्मकतेचा परिणाम आपोआप कमी होऊ लागतो.

Web Title: How to control on your anger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • Anger Control

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.