Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शारीरिक संबंधादरम्यान Urine लीक होतेय का? काय आहे कारण, कसे ठेवावे नियंत्रण

Urine Leakage During Intimacy: सामान्यतः शारीरिक संबंधामध्ये युरिन लीकेज होण्याचा त्रास कोणाला होत नाही. मात्र असा त्रास जर कोणत्याही स्त्री ला होत असेल तर तुम्हाला कोणत्या तरी मेडिकल कंडिशनचा सामना करावा लागत आहे आणि हे नक्कीच नैसर्गिक नाही. जाणून घ्या काय आहेत कारणं?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 23, 2024 | 01:19 PM
युरिन लीकेज का होते आणि काय आहेत याचे परिणाम

युरिन लीकेज का होते आणि काय आहेत याचे परिणाम

Follow Us
Follow Us:

काही अशा महिला आहेत, ज्यांना शारीरीक संबंध अथवा इंटरकोर्सदरम्यान लघ्वी बाहेर येण्याचा त्रास होतो. तर काही महिलांना केवळ संभोगाच्या वेळीच नाही नुसत्या फोरप्ले दरम्यानदेखील  urine leakage चा त्रास होऊ शकतो. हे नक्कीच नॉर्मल नाहीये. सामान्यतः असा त्रास शारीरिक संबंधादरम्यान होत नाही. पण असा त्रास ज्या स्त्री ला होत आहे तिने अजिबात दुर्लक्ष करू नये कारण ही गोष्ट नैसर्गिक नाही हे वेळीच लक्षात घ्यावे. 

शारीरिक संबंधादरम्यान युरिन लीकेज नक्की का होते? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर विद्या नर्सिंग होमच्या ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. नीरज शर्मा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी शारीरिक संबंधादरम्यान युरिन लीकेजचे कारण सांगत काही गोष्टी टाळाव्यात असेही सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिनेस 

शारीरिक संबंधादरम्यान लघ्वी होण्याचे कारण

जेव्हा महिलांचे पेल्विक फ्लोअरच्या मांसपेशी कमकुवत होतात तेव्हा अशा स्थितीमध्ये युरिनरी इन्कॉन्टिनेसचा सामना करावा लागतो. शारीरिक संबंधाच्या स्टिम्युलेशनमुळे ब्लॅडर अथा युरेथ्रावर ताण येतो आणि जर तुम्हाला पहिल्यापासूनच युरिनरी इन्कॉन्टिनेस समस्या असेल तर शारीरिक संबंधादरम्यान, जास्त हसल्यावर वा शिंकल्यावर लघ्वी होण्याचा त्रास होऊ शकतो. 

हेदेखील वाचा – वयानुसार दर महिन्यात किती वेळा ठेवावे शारीरिक संबंध? धक्कादायक आकडे अहवालातून समोर

बद्धकोष्ठता 

बद्धकोष्ठता किती ठरते त्रासदायक

बद्धकोष्ठता ही हल्ली वाढलेली समस्या आहे. शौचाला कडक होत असल्यामुळे आपल्या नसांवर ताण येतो. अशा स्थितीमध्ये लघ्वी होणे हे साहजिकच आहे. मात्र अनेक महिलांना बद्धकोष्ठतेमुळेही हा त्रास होत चाललेला दिसून येत आहे. 

अल्कोहोल वा कॅफिन सेवन 

दारू आणि कॅफिनचा कसा होतो परिणाम

एखाद्या महिलेने शारीरिक संबंधापूर्वी जर अति मद्यप्राशन केले असेल अथवा तिने जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केले असेल तर लघ्वी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. बेवरेजेस ड्युरेटिक असतात जे लघ्वी पास करतात आणि ज्यामुळे युरिन लीकेज होते वा आपण लघ्वी थांबवू शकत नाही. 

ओव्हर अ‍ॅक्टिव्ह ब्लॅडर 

ओव्हर अ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरमुळे अचानक लघ्वीला जावेसे वाटते ज्यामुळे सतत बाथरूमच्या फेऱ्या माराव्या लागतात. तुम्ही जर 24 तासात 8-9 वेळा लघ्वीला जात असाल तर तुम्हाला ओव्हर अ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरचा त्रास आहे हे समजून जावे. यादरम्यान तुम्ही जर शारीरिक संबंध ठेवत असाल तर अचानक लघ्वी लीकेज होण्याचा त्रास होऊ शकतो. 

हेदेखील वाचा – सकाळीच शारीरिक संबंध ठेवाल तर मिळतील कमालीचे फायदे, रिसर्चमध्ये खुलासा

कशी काळजी घ्यावी 

कोणत्या गोष्टी जपाव्यात

  • किगल व्यायाम करा. ज्यामुळे पेल्विक मसल्स मजूबत होतात आणि तुम्हाला युरिन लीकेजची काळजी राहत नाही
  • रोज फायबरयुक्त पदार्थ खावे जेणेकरून तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही 
  • शारीरिक संबंधांपूर्वी तुम्ही ब्लॅडर रिकामे करा आणि लघ्वीला जाऊन या. संपूर्ण ब्लॅडर रिकामे असेल तर युरिन लीकेज होणार नाही
  • शारीरिक संबंधांपूर्वी पाणी पिऊ नका. तसंच कोणतेही कॅफिनयुक्त ड्रिंक पिऊ नका जेणेकरून त्रास होईल
  • तसंच सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्लॅडरवर भार पडेल अशी कोणतीही पोझिशन शारीरिक संबंधादरम्यान ठेऊ नका 
  • डॉक्टरांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे योग्य परिस्थिती जाणून त्यानुसार वागा 
टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How to control urine leakage during physical intimacy prevention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 01:19 PM

Topics:  

  • Health News
  • Physical Intercourse

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बालकांच्या आरोग्याचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’! ९४ लाखांची तपासणी, ६.५८ लाख मुलांमध्ये आरोग्य समस्या
1

महाराष्ट्रातील बालकांच्या आरोग्याचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’! ९४ लाखांची तपासणी, ६.५८ लाख मुलांमध्ये आरोग्य समस्या

SBI Free Online Courses: करिअरला द्या नवी दिशा! SBI च्या ‘या’ फ्री ऑनलाईन कोर्सेसमधून मिळवा फायनान्सचे धडे
2

SBI Free Online Courses: करिअरला द्या नवी दिशा! SBI च्या ‘या’ फ्री ऑनलाईन कोर्सेसमधून मिळवा फायनान्सचे धडे

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
3

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
4

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.