Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यातही व्हाल टॅन! ‘या’ गोष्टी करा दररोजच्या वापरातून बॅन, ‘हे’ घ्या फेस पॅक टिप्स

हिवाळ्यातही धुक्यांमधून येणारे युएव्ही किरण त्वचेला टॅन करतात, त्यामुळे सनस्क्रीन लावणं अत्यावश्यक आहे. गव्हाच्या पिठासोबत दही, केळी किंवा पपई मिसळून केलेले तीन घरगुती फेस पॅक टॅनिंग कमी करण्यात प्रभावी ठरतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 29, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो म्हणून चेहऱ्यावर टॅन होत नाही असा अनेक महिलांचा समज असतो, परंतु हा समज चुकीचा आहे. थंडीत जरी गार हवा असली तरी धुक्यांमधून येणारे अल्ट्राव्हायोलेट किरण त्वचेसाठी अधिक हानिकारक ठरू शकतात. हिवाळ्यात सनस्क्रीन वापरणं अनेकजणी टाळतात आणि नकळत त्वचेवर टॅनिंग वाढत जातं. गारवा असल्याने सकाळच्या उन्हात बसण्याची किंवा फिरण्याची इच्छा होते, परंतु तज्ज्ञांच्या मते सकाळी ८ ते १० ही वेळ तुलनेने सुरक्षित असून त्यानंतर त्वचेवर युएव्ही किरणांचा प्रभाव वाढतो आणि त्वचा पटकन काळवंडू शकते. (How to get rid of tanning in Winter)

विकतचे च्यवनप्राश आणून खाण्यापेक्षा घरी पारंपरिक पद्धतीने बनवा आवळ्याचे च्वनप्राश, थंडीत सुधारेल शरीराची रोगप्रतिकारशक्ती

जर तुमची त्वचा आधीच टॅन झाली असेल, तर घरच्या घरी करता येणारे गव्हाच्या पिठाचे फेस पॅक प्रभावी ठरतात. दही–गहू पीठ पॅक त्वचेवरील मृत पेशी दूर करून चेहऱ्याचा नॅचरल ग्लो परत आणतो. एका वाटीत एक चमचा गव्हाचं पीठ, दही आणि काही थेंब गुलाबजल मिसळून तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटांनी धुतल्यास त्वचा उजळते आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा पॅक वापरावा. दुसरा म्हणजे केळी–गहू पीठ फेस पॅक. केळ्यातील नैसर्गिक मॉइश्चर त्वचेची कोरडेपणा कमी करत उजळपणा वाढवते. यासाठी एक चमचा गव्हाचं पीठ, पिकलेल्या केळीची पेस्ट आणि थोडं कच्चं दूध मिसळून चेहऱ्यावर लावावं. हा पॅक ३० मिनिटं ठेवून नंतर हलका स्क्रब केल्यास मृत त्वचा दूर होते आणि टॅनिंग कमी दिसू लागते.

आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरणं फायदेशीर. तिसरा म्हणजे पपई–गहू पीठ फेस पॅक. पपईत असलेलं व्हिटॅमिन C त्वचेला उजळपणा देतं तर गव्हाचं पीठ नैसर्गिक एक्सफोलिएशन करतं. पपईची पेस्ट, एक चमचा गव्हाचं पीठ आणि मध मिसळून तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर २० ते ३० मिनिटं ठेवून नंतर स्क्रब करावा. नियमित वापराने टॅनिंग कमी होतं आणि त्वचा ताजी दिसते. टॅनिंग टाळण्यासाठी काही मूलभूत सवयी आवश्यक आहेत.

Lifestyle Tips: घरामध्ये कोथिंबीरीचे रोप लावण्यासाठी जाणून घ्या सोपी पद्धत

बाहेर जाण्यापूर्वी SPF 30+ सनस्क्रीन वापरणं, चेहऱ्यावर दिवसातून किमान दोन वेळा मॉइश्चरायझर लावणं, पुरेसं पाणी पिणं आणि दुपारी १२ ते ३ या वेळेत सूर्यप्रकाश टाळणं. त्वचेची योग्य काळजी घेतली आणि हे सोपे घरगुती उपाय नियमित केले तर हिवाळ्यातही चेहरा उजळ, टॅन-फ्री आणि निरोगी राहू शकतो.

Web Title: How to get rid of tanning in winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

वयाच्या ३० व्या वर्षानंतर सुद्धा टिकून राहील त्वचेचे सौंदर्य! जास्त खर्च न करता नियमित फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
1

वयाच्या ३० व्या वर्षानंतर सुद्धा टिकून राहील त्वचेचे सौंदर्य! जास्त खर्च न करता नियमित फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे होतील गायब! रोजच्या आहारात करा ड्रॅगन फ्रूटचा समावेश, शरीरावर दिसून येतील जादुई परिणाम
2

चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे होतील गायब! रोजच्या आहारात करा ड्रॅगन फ्रूटचा समावेश, शरीरावर दिसून येतील जादुई परिणाम

उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C सीरम, चेहऱ्यावर येईल ग्लो
3

उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C सीरम, चेहऱ्यावर येईल ग्लो

Summer Skin Care: वाढत्या उन्हाळ्यात सुद्धा त्वचेला मिळेल भरपूर पोषण! १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा Detox water
4

Summer Skin Care: वाढत्या उन्हाळ्यात सुद्धा त्वचेला मिळेल भरपूर पोषण! १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा Detox water

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.