Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही सुद्धा केमिकल असणारा आंबा खाताय का? ‘या’ सोप्या पद्धतीने ओळखा खरा हापूस !

उन्हाळ्याचे दिवस जसे सुरु होतात तसे अनेक जणांना आंबा खाण्याचा मोह होतो. पण अनेकदा आंबा गोड करण्यासाठी काही जण केमिकलचा वापर करत असतात. हा केमिकलयुक्त आंबा तुम्ही ओळखणार कसा?

  • By मयुर नवले
Updated On: Apr 16, 2025 | 09:34 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याचा सीजन सुरू झाला आहे. जरी हा काळ उष्णतेमुळे अनेकांना त्रासदायक वाटत असला, तरी काही जण आंब्यामुळे अनेक लोक या ऋतूची आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा हा बहुतांश लोकांचा आवडता फळ आहे.

सध्या बाजारात आंब्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे या मागणीची पूर्तता करण्यासाठी अनेक ठिकाणी भेसळयुक्त आणि रासायनिक पदार्थांनी पिकवलेले आंबे विक्रीस आणले जात आहेत. असे आंबे आपल्या आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकतात.

अशा परिस्थितीत, आंबा खरेदी करताना तो नैसर्गिकरीत्या पिकवलेला आहे की केमिकलच्या सहाय्याने, हे ओळखणे फार महत्वाचे आहे. चला, आपण अशाच काही सोप्या पद्धती जाणून घेणार आहोत, ज्यांच्या मदतीने केमिकल पद्धतीने पिकवलेले आंबे तुम्ही सहज ओळखाल.

कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये घरी बनवा खरबूज बियांचे मिल्कशेक! बियांचा करा ‘अशा’ पद्धतीने वापर

केमिकलयुक्त आंबा कसा ओळखाल?

सुगंध घेऊन ओळखा

नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांमध्ये गोडसर फळांचा नैसर्गिक सुगंध असतो, तर कृत्रिम पद्धतीने केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांमध्ये थोडासा रासायनिक किंवा विचित्र वास जाणवू शकतो.

डाग व ओरखडे तपासा

केमिकल पद्धतीने पिकवलेले आंबे पाहताना त्यावर जखमा, डाग किंवा ओरखडे दिसू शकतात. केमिकलच्या प्रभावामुळे फळांची त्वचा खराब होते. अशा आंब्यांचे सेवन टाळणे उत्तम. नैसर्गिक आंब्यांवर असे डाग सहसा आढळत नाहीत.

आंब्याचा घट्टपणा जाणून घ्या

नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे हातात घेतल्यावर किंचित घट्ट आणि टवटवीत वाटतात, तर केमिकलने पिकवलेले आंबे अधिक मऊ वाटतात. हे केमिकल फळांच्या पेशींना कमकुवत करतात, ज्यामुळे त्यांची घनता कमी होते.

भावंडांमधील Sibling Divorce म्हणजे काय? गायिका सोनू आणि नेहा कक्करमधील वादाची सोशल मीडियावर मोठी चर्चा

बेकिंग सोडा प्रयोग

एका भांड्यात पाण्यात थोडा बेकिंग सोडा मिसळून त्यात आंबे 15 ते 20 मिनिटे भिजवा. नंतर ते धुऊन पहा, जर आंब्याचा रंग बदलत असेल, तर ते केमिकल पद्धतीने पिकवलेले किंवा पॉलिश केलेले असण्याची शक्यता आहे.

आंब्याची साल तपासा

केमिकलयुक्त आंब्यांचा रंग एकसंध आणि अधिक पिवळसर किंवा नारिंगी असतो, तर नैसर्गिक आंब्यांमध्ये रंगात थोडा फरक व असमानता दिसते. केमिकलयुक्त आंबे थोडे अधिक चमकदारही वाटू शकतात.

चव तपासा

केमिकलने पिकवलेला आंबा चवीनं थोडा फिका, आंबटसर किंवा कृत्रिम चव घेऊन येतो. तर नैसर्गिक आंबा गोडसर, रसाळ आणि ताजेपणाची जाणीव करून देतो.

पाण्यात आंबे भिजवून ठेवा

एक बादली पाण्यात आंबे टाका. नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे पाण्यात बुडतात, तर रासायनिक प्रक्रियेतून गेलेले आंबे पाण्यावर तरंगू शकतात.

या सोप्या चाचण्या करून तुम्ही आरोग्यदायक आणि नैसर्गिक आंब्यांची निवड सहज करू शकता.

Web Title: How to identify natural mango and chemical mango

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 09:34 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • lifestyle news
  • raw mango

संबंधित बातम्या

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!
1

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

चेहऱ्यावरील सर्व डाग, मुरुम एका आठवड्यातच होतील गायब; फक्त 5 मिनिटांतच भारतीय मसाल्यांपासून घरी बनवा हे मॅजिकल ड्रिंक
2

चेहऱ्यावरील सर्व डाग, मुरुम एका आठवड्यातच होतील गायब; फक्त 5 मिनिटांतच भारतीय मसाल्यांपासून घरी बनवा हे मॅजिकल ड्रिंक

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
3

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर
4

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.