कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये घरी बनवा खरबूज बियांचे मिल्कशेक
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घरी कलिंगड, टरबूज, काकडी, ताडगोळे इत्यादी अनेक थंड पदार्थ आणले जातात. वाढत्या उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. उष्णता वाढल्यानंतर पोटात सतत जळजळ होणे, अपचनाची समस्या, त्वचेमध्ये होणारे बदल इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडणारे फळ म्हणजे खरबूज. टरबूजमध्ये प्रथिने, कर्बोदके, पाणी, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम,सोडियम आणि इतर वेगवेगळे जीवनसत्वे आढळून येतात. खरबूज घरी आणल्यानंतर त्यातील बिया काढून टाकल्या जातात आणि आतील मऊ पदार्थाचे सेवन केले जाते. खरबूज हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. खरबूजच्या आतील बिया सुद्धा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात., खरबूज कापल्यानंतर त्यातील बिया फेकून दिल्या जातात. मात्र असे न करता खरबूजाच्या बियांपासून मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या खरबूज शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
आंबोळ्यांसोबत चटणी खाऊन कंटाळा आहे? अस्सल मालवणी पद्धतीमध्ये बनवा काळ्या वाटण्याची चविष्ट उसळ