Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेले Uric Acid त्वरीत कमी करतील 5 सीड्स, सांध्यातील क्रिस्टल होतील साफ

युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या सुरू होऊ शकतात ज्यामध्ये सांधेदुखी सर्वात सामान्य आहे. युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी आहारात कोणत्या बियांचा समावेश करावा ते जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 30, 2025 | 04:21 PM
युरिक अ‍ॅसिडवरील घरगुती उपाय आहेत या बिया (फोटो सौजन्य - iStock)

युरिक अ‍ॅसिडवरील घरगुती उपाय आहेत या बिया (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:

आजकाल युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढण्याची समस्या सामान्य होत चालली आहे. शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने गाउट, सांधेदुखी, सूज आणि किडनीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. शरीरात काही प्रमाणात युरिक अ‍ॅसिड असते, परंतु त्याची वाढ धोकादायक ठरू शकते.

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी, आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काही बिया आहेत ज्या युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास मदत करतात. या ५ बियांबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार आपण याबाबत जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

भोपळ्याच्या बिया 

भोपळ्याच्या बिया ठरतील उत्तम

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, जस्त आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या बिया युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करतात.

काय आहेत फायदे

  • मॅग्नेशियम युरिक अ‍ॅसिडचे क्रिस्टलायजेशन रोखते
  • त्यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड जळजळ कमी करतात
  • फायबरचे प्रमाण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते
कसे खावे?

भोपळ्याच्या भाजलेल्या बिया नाश्ता म्हणून खाऊ शकतात किंवा सॅलड आणि स्मूदीमध्ये घालता येतात. तसंच तुम्ही नियमित याचा नाश्त्यामध्ये समावेश करून घेऊ शकता. 

शरीरामध्ये वाढतोय युरिक अ‍ॅसिड; ‘या’ गोष्टींपासून ठेवा अंतर, त्रास होईल छू मंतर

आळशीच्या बिया

आळशी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आळशी किंवा आळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि लिग्नान्स भरपूर प्रमाणात असतात, जे युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास मदत करतात.

काय आहेत फायदे

  • ओमेगा-३ जळजळ आणि वेदना कमी करते
  • फायबर शरीरातून युरिक अ‍ॅसिड काढून टाकण्यास मदत करते
  • अँटीऑक्सिडंट्स शरीराला डिटॉक्स करतात
कसे खावे?

तुम्ही आळशीची बारीक पावडर करून दही, सॅलड किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता. याशिवाय काही भाज्यांमध्येदेखील तुम्ही आळशीचा वापर करून घेऊ शकता 

सूर्यफुलाचे बी

सूर्यफूल बी करेल कमाल

सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ई, सेलेनियम आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहेत. हे शरीरातील युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन नियंत्रित करतात आणि मूत्रपिंडांना विषमुक्त करण्यास मदत करतात.

कसे खावे?

  • ते भाजून नाश्त्यात समाविष्ट करा
  • ते दही किंवा स्मूदीमध्ये मिसळून खा
चिया सीड्स

चिया सीड्सचे फायदे

चिया बिया प्रथिने, फायबर आणि ओमेगा-३ चा चांगला स्रोत आहेत, जे युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास मदत करतात.

चिया सीड्सचे फायदे

  • फायबर शरीरातून युरिक अ‍ॅसिड काढून टाकते
  • कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होतात
  • अँटीऑक्सिडंट्स मूत्रपिंडाचे कार्य सुधारतात.
कसे खावे?

चिया बिया पाण्यात भिजवून जेल बनवा आणि ते स्मूदी, दही किंवा ओटमीलमध्ये मिसळून खा

युरिक अ‍ॅसिड त्वरीत काढेल शरीराबाहेर, 5 आयुर्वेदिक उपाय कराच

तीळ

तीळांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास मदत करतात.

तिळाचे फायदे

तिळाचा करून घ्या उपयोग

  • तिळामुळे युरिक अ‍ॅसिडचे चयापचय सुधारते
  • दाहक-विरोधी गुणधर्म सांधेदुखी कमी करतात
  • फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते.
कसे खावे?

तुम्ही तीळ भाजून लाडू बनवू शकता किंवा सॅलड आणि भाज्यांमध्ये मिक्स करून खाऊ शकता

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How to lower uric acid quickly with 5 seeds flax seeds sesame and relieve joint pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • Health Tips
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

Hangover Tips: रात्री दारू पिऊन झालाय हँगओव्हर, करा सोपे उपाय
1

Hangover Tips: रात्री दारू पिऊन झालाय हँगओव्हर, करा सोपे उपाय

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट
2

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट

Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे
3

Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे

शरीरात साचलेले Uric Acid आठवडाभरात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ डाळीचा समावेश, सांध्यांमधील वेदना होईल गायब
4

शरीरात साचलेले Uric Acid आठवडाभरात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ डाळीचा समावेश, सांध्यांमधील वेदना होईल गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.