युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर ही पेय ठरतील गुणकारी
शरीरामध्ये युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. संधिवात, हृदयविकार, किडनी स्टोन, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेत निरोगी जीवन जगणे आवश्यक आहे. शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढल्यामागे अनेक कारण आहेत. शरीरात प्युरीन वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आहारात प्युरीन युक्त पदार्थांचे सेवन करू नये. प्युरीनची पातळी वाढल्यानंतर प्रामुख्याने हे घटक लघवीद्वारे बाहेर पडून जातात. पण प्युरीनची पातळी वाढल्यानंतर किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली युरिक ॲसिडची पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
बाजारात चेहरा सहज उपलब्ध होतात. चेरीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आंबट गोड चवीची चेरी सगळ्यांचं खूप आवडते. चेरीमध्ये अँथोसायनिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे चेरीचा रस प्यायल्यास गाउटपासून मुक्त होण्यास मदत होते.
हे देखील वाचा: चिकन मटण खाण्याऐवजी ‘या’ कॅल्शियम युक्त पदार्थांचे आहारात करा सेवन, हाडे राहतील मजबूत
रोजच्या आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. लिंबू पाण्यात सायट्रिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
ऍपल सायडर व्हिनेगर यूरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. शरीराच्या नसांमध्ये आणि हाडांमध्ये वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगरचा फायदा होतो.
नियमित सकाळी उठल्यानंतर कोथिंबिरीच्या पाण्याचे सेवन केल्यास यूरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. कोथिंबीरीचे सेवन केल्यास शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते.
हे देखील वाचा: Healthy Alcohol Drink: या अल्कोहल ड्रिंक आहेत हेल्दी, बिनधास्त करा सेवन
पुदिन्याच्या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. पुदिन्याचे पाणी बनवण्यासाठी गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून उकळवून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड करून प्या.