सोप्या पद्धतीमध्ये केळ्यांपासून बनवा तिखट गोड कोशिंबीर
आपल्यातील सगळ्यांचं फळे खायला खूप आवडतात. फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.रोजच्या आहारात नियमित केळी, सफरचंद, द्राक्ष, कलिंगड इत्यादी फळांचे सेवन करावे. या फळांमध्ये असलेले पोषक घटक शरीराला आवश्यक जीवनसत्वे देतात. आज माही तुम्हाला केल्याचे कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. याआधी तुम्ही अनेकदा घरी केळ टाकून बनवलेला शिरा किंवा शिकरण खाल्ले असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला केळ्याची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही केळ्याची कोशिंबीर बनवू शकता. कोकणामध्ये केळ्याची कोशिंबीर मोठ्या प्रमाणात बनवली जाते. जेवणात जर केळ्याची कोशिंबीर असेल तर दोन घास जेवण जास्त जाते. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा इडलीचे चविष्ट चाट, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश