उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा इडलीचे चविष्ट चाट
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. सतत कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीत इडलीचे चाट बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं इडली खायला खूप आवडते. इडलीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. नाश्त्यामध्ये आंबवलेले पदार्थ खाल्यामुळे शरीराला फायदे होतात. इडलीचे पीठ तयार करून रात्रभर आंबवले जाते. त्यानंतर सकाळी उठून पिठाच्या इडली बनवल्या जातात. त्यामुळे तुम्हाला नव्या पद्धतीमध्ये इडलीचा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही इडलीचे चाट सहज बनवू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गावराण स्टाईल आंबट-तिखट टोमॅटोचा सार; गरमागरम भातासोबत अप्रतिम लागेल