उन्हाळ्यात दुधाचा चहा बनवून पिण्यापेक्षा सोप्या पद्धतीने घरी बनवा lemon ice Tea
सकाळी उठल्यानंतर आपल्यातील अनेकांना दुधाचा किंवा काळा चहा पिण्याची सवय असते. या चहाचे सेवन केल्यामुळे झोप लगेच उडून जातो. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अति चहाचे सेवन केल्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे उपाशी पोटी चहाचे सेवन करू नये. उन्हाळ्यात घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना त्यांना चहा दिला, जातो मात्र सतत चहा पिऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. त्यामुळे तुम्ही दुधाचा चहा बनवण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये लेमन आईस टी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने चहा बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – iStock)
रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गावराण स्टाईल आंबट-तिखट टोमॅटोचा सार; गरमागरम भातासोबत अप्रतिम लागेल
कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा बदाम शेक, लहान मुलांस मोठेसुद्धा पितील आवडीने