विकतची मिठाई आणण्यापेक्षा ब्रेडचा वापर करून झटपट बनवा मऊमऊ-रवाळ कलाकंद
श्रावण महिन्यात येणारा दुसरा सण म्हणजे राखी पौर्णिमा. यादिवशी बहीण भावाच्या मनगटामध्ये राखी बांधते. सणावाराच्या दिवसांमध्ये घरात अनेक वेगवेगळे मिठाईचे प्रकार बनवले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मिठाई खायला खूप जास्त आवडते. मिठाईचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र नेहमीच सणावाराच्या दिवसांमध्ये बाहेरून विकत आणलेली मिठाई खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ब्रेडचा वापर करून कलाकंद बनवू शकता. जिभेवर ठेवताच विरघळणारा कलाकंद सगळ्यांचं आवडतो. नेहमीच दूध आटवून कलाकंद बनवला जातो. पण आज आम्ही तुम्हाला ब्रेडचा वापर करून कलाकंद बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सणाच्या दिवशी बाजारात मिठाईच्या किमतींमध्ये वाढ होते. त्यामुळे कमीत कमी वेळात तुम्ही झटपट मिठाई बनवू शकता. चला तर जाणून घेऊया कलाकंद बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य –pinterest)
Raksha Bandhan 2025 : स्वीट डिशने वाढवा सणाचा गोडवा! घरी बनवा सर्वांच्या आवडीचा मऊ अन् रसाळ रसगुल्ला