
जिभेवर ठेवताच विरघळून जाईल शाही चवीचा 'कॅरॅमल शिरा'
सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, थालीपीठ, पराठा इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण नेहमी नेहमी तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. शिरा बनवताना रवा भाजून त्यात साखर मिक्स केली जाते. या पद्धतीने शिरा बनवला जातो. पण आज आम्ही तुम्हाला शाही चवीचा कॅरॅमल शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पारंपरिक चवीच्या शिऱ्यापेक्षा कॅरॅमल शिऱ्याची चव अतिशय वेगळी लागते. घरातील कोणत्याही पूजेच्या दिवशी किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही कॅरॅमल शिरा बनवू शकता. हा शिरा तोंडात टाकताच सहज विरघळून जाईल. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी कायम काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी झटपट तुम्ही कॅरॅमल शिरा बनवू शकता.चला तर जाणून घेऊया कॅरॅमल शिरा बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)