विकतचे चॉकलेट खाणे कायमचे जाल विसरून! या पदार्थांचा वापर करून घरी बनवा healthy candy
केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा होणे या अतिशय सामान्य समस्या राहिल्या आहेत. कारण मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच त्वचा आणि केसांसंबधित कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहेत.धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. आहारात सतत होणारे बदल त्वचा आणि केसांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे कायमच योग्य आहार, पौष्टिक पदार्थांचे सेवन आणि भरपूर पाणी पिऊन हेल्दी राहणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पौष्टिक पदार्थांचा वापर करून हेल्दी कँडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर अनेकांना ABC ज्यूस पिण्याची सवय असते. मात्र कामाच्या धावपळीमध्ये हा रस बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे या तीन पदार्थांचा वापर करून तुम्ही कँडी बनवू शकता. या कँडीचे सेवन केल्यास शरीर, त्वचा आणि केसांना भरपूर पोषण मिळेल आणि तुम्ही हेल्दी राहाल. घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेली कँडी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया हेल्दी कँडी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)






