
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. तांदळाची खीर, शेवयांची खीर, गुलाबजाम तर काहीवेळा विकतचे श्रीखंड आणून खाल्ले जाते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करून दाटसर खीर बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय भन्नाट लागतो. ओल्या खोबऱ्याची चव, सुका मेवा,वेलची पावडर इत्यादी पदार्थांमुळे खीर अतिशय सुंदर लागते. त्यामुळे घाईगडबडीच्या वेळी गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही ओल्या खोबऱ्याची खीर बनवू शकता. श्रावण महिन्यात प्रत्येक घरात वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. यामुळे सणांचा उत्साह आणखीनच वाढतो. चला तर जाणून घेऊया ओल्या खोबऱ्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)