Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग घरी बनवा खुसखुशीत मटार करंजी, वाचा सोपी रेसिपी

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे मटारपासून सोप्या पद्धतीमध्ये मटार करंजी बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 23, 2024 | 11:40 AM
घरी बनवा खुसखुशीत मटार करंजी

घरी बनवा खुसखुशीत मटार करंजी

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये सतत काहींना काही खाण्याची इच्छा होत राहते. अशावेळी अनेकदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण सतत बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्याऐवजी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे आरोग्यालासुद्धा फायदे होतील आणि कोणतीही हानी पोहचणार नाही. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यात पालेभाज्य, फळभाज्या इत्यादी भाज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. त्यातील बाजारात सगळ्यात जास्त विकली जाणारी भाजी म्हणजे हिरवे वाटाणे. हिरवे वाटाणे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतात. वाटाण्यांपासून भाजी, पुलाव, कटलेट इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण तुम्ही कधी मटार करंजी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर ही रेसिपी नक्की बनवून पहा. चला तर जाणून घेऊया मटार करंजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • हिरवे मटार
  • मैदा
  • बटाटा
  • खोबऱ्याचे तुकडे
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • तेल
  • हिंग
  • आलं लसूण पेस्ट
  • आमचूर पावडर
  • धणे पावडर
  • कोथिंबीर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • मटार करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून कणिक मळून घ्या.
  • त्यानंतर मळून घेतलेल्या पिठाला तेल लावून 10 ते 15 पीठ बाजूला ठेवून घ्या. यामुळे पीठ व्यवस्थित मऊ होईल.
  • उकडवून घेतलेले मटार मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात हिरवी मिरची टाकून बारीक वाटून घ्या.
  • वाटून घेतलेले मटार मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकून मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ, धणे पावडर, आमचूर पावडर, आलं लसूण पेट आणि बारीक करून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण त्यात टाकून मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल टाकून हिंग टाका. नंतर त्यात मिक्स करून घेतलेले मटारचे मिश्रण टाकून ५ मिनिटं शिजवून घ्या.
  • तयार केलेलं सारण थंड झाल्यानंतर वाटीमध्ये काढून घ्या.
  • मैद्याच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या. लाटून घेतलेल्या पुऱ्यांमध्ये सारण भरून करंजी बनवा.
  • तयार केलेली करंजी तेलात सोडून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मटार करंजी.

Web Title: How to make crispy matar karanji at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
1

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
2

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
3

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी
4

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.