
अक्रोड खजुराची शुगर फ्री बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी
दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळीमध्ये सगळ्यांच्या घरी फराळ बनवण्याची, खरेदीची, साफसफाई करण्याची मोठी घाई असते. या दिवसांमध्ये घरात आनंदी वातावरणात असते. हिंदू संस्कृतीमध्ये सण उत्सवांना विशेष महत्व आहे. दिवाळीमध्ये फराळाच्या ताटात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात चकली, लाडू, करंज्या, शेव इत्यादी अनेक गोड पदार्थ बनवले जातात. तसेच पाहुण्यांच्या घरी गोड पदार्थ, भेट वस्तू, ड्रायफ्रुटस इत्यादी पदार्थ नेले जातात. दिवाळीमध्ये बनवला जाणारा फराळ सगळेजण आवडीने खातात. काहींना लाडू आवडतात तर काहींना चकली करंजी. तसेच मित्र मैत्रिणी आणि पाहुण्यांना छान भेटवस्तू दिल्या जातात.
दिवाळीमध्ये पाहुण्यांच्या घरी जाताना नेमकी काय भेटवस्तू घेऊन जावी असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी अनेक लोक मिठाई किंवा इतर गिफ्टच्या वस्तू घेऊन जातात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये पाहुण्यांकडे जातात तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलेली अक्रोड खजूरची शुगर फ्री बर्फी घेऊन जाऊ शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच कमीत कमी साहित्यामध्ये नैसर्गिक गोडवा असलेली बर्फी तयार होते. चला तर जाणून घेऊया अक्रोड खजुराची शुगर फ्री बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)