
१० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कोथिंबीर-पनीर कबाब
सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. हेल्दी पदार्थ सकाळच्या नाश्त्यात खाल्ल्यास दुपारपर्यंत भूक लागत नाही आणि पोट सुद्धा भरलेले राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी कोथिंबीर पनीर कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. व्यायाम करून आल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. अशावेळी पनीर सॅलड किंवा पनीरपासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच साधं पनीर खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी कोथिंबीर पनीर कबाब हा पर्याय अतिशय उत्तम आहे. तुम्ही बनवलेले कबाब लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया कोथिंबीर पनीर कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)