
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत काळ मटण, नोट करून घ्या रेसिपी
सुट्टीच्या दिवशी हमखास पाहुणे घरात येतात. पाहुणे घरी आल्यानंतर नेमकं शाहाकारी पदार्थ बनवावे की मांसाहारी पदार्थ बनवावे? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. अनेकांच्या घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास दिले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले टेस्टी आणि हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावेत. आज आम्ही तुम्हाला गावरान पद्धतीमध्ये काळ मटण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे मटण चवीला अतिशय सुंदर लागते. गरमागरम भाकरी आणि वाफाळत्या भातासोबत काळे मटण सुंदर लागते. तुम्ही बनवलेलं काळं मटण खाऊन पाहुणे सुद्धा खूप खुश होतील. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर इत्यादी ठिकाणी काळे मटण बनवले जाते. मटण मसाल्याच्या प्रमाणामुळे आणि शिजवण्याच्या पद्धतीमुळे मटणची चव अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया काळ मटण बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)