
रविवारच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये तांदूळ रव्याचा वापर न करता पौष्टिक पालक इडली
रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. या दिवशी घरातील सर्वच सदस्यांना सुट्टी असते. आरामात उठणे, त्यानंतर नाश्ता, जेवण इत्यादी सर्वच कामे लेट असतात. अशावेळी बाहेरून विकतचा नाश्ता आणून खाल्ला जातो. वडापाव, सामोसा, मेदुवडा किंवा इतर वेगवेगळे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच बाहेरचे पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये पालक इडली बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. पालक इडली हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. यासाठी डाळ किंवा तांदूळ भिजत ठेवण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ खायला आणि बनवायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. दक्षिण भारतीय पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. दक्षिण भारतीय पदार्थांची चव चाखण्यासाठी कायमच केरळ किंवा दक्षिण भारतात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरच्या घरी सुद्धा हे पदार्थ सहज बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पौष्टिक पालक इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)