उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा खमंग मऊ उपवासाचा पराठा
सकाळच्या नाश्त्यात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर अनेक वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात. मात्र उपवासाच्या दिवशी नेमकं काय खावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, बटाटा हेच ठराविक पदार्थ खाल्ले जातात. मात्र उपाशी पोटी साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढून अपचन होते. गॅस, आम्ल्पित्त वाढते आणि वारंवार आंबट ढेकर येऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी खमंग मऊ पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पराठा कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा काहीशी कमी होऊन जाते. ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी पोटभर नाश्ता करावा. चला तर जाणून घेऊया उपवासाचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
लाखो वर्षांपासून भारतीय लोक हाताने का जेवतात? जाणून घ्या शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे