
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आलं-लिंबू पाचक
रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. वारंवार गॅस, ऍसिडिटी किंवा पचनाच्या सर्वच समस्या उद्भवू लागतात. पचनाची समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. पोटात उष्णता वाढणे, बद्धकोष्ठता किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात वाढलेली ऍसिडिटी कमी करण्यासाठी आलं लिंबू पाचकचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. आल्याच्या रसात ‘जिंजेरॉल’ नावाचे संयुग आढळून येतात. त्यामुळे अपचन, गॅसेस आणि पोटदुखी कमी होते. तसेच लिंबाच्या रसात विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. विटामिन सी युक्त पेयांचे नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पोटात गॅस वाढल्यानंतर कोणताही पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तुम्ही आलं लिंबू पाचक पिऊ शकता. चला तर जाणून घेऊया आलं लिंबू पाचक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
गटारी होईल आणखीनच स्पेशल! भाकरी-वड्यांसोबत खाण्यासाठी झटपट बनवा झणझणीत मटण चॉप्स फ्राय
उरलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मऊसर इडली, नोट करून घ्या पदार्थ