भाकरी-वड्यांसोबत खाण्यासाठी झटपट बनवा झणझणीत मटण चॉप्स फ्राय
श्रावण महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. श्रावणाच्या आधी प्रत्येक घरात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात. या महिन्यात येणायऱ्या ‘आषाढी अमावस्येला’ गटारी अमावस्या असे सुद्धा म्हंटले जाते. या अमावस्येला घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गटारीच्या दिवशी खाद्यप्रेमी मटण, चिकन, मच्छीचा बेत करतात. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गटारी साजरा केली जाते. नेहमीच घरात चिकन किंवा मासे बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला गटारीनिमित्त झणझणीत मटण चॉप्स फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. मटण पासून अनेक वेगवेगळे पदार्थ कायमच घरी बनवले जातात. झणझणीत मटण चॉप्स फ्राय हा पदार्थ तुम्ही भाकरी किंवा वड्यांसोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया झणझणीत मटण चॉप्स फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Sunday होईल आणखीनच मजेदार! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा बटाटा सँडविच, नोट करा रेसिपी
गटारी स्पेशल! स्टार्टर्सने वाढेल जेवणाची मजा; घरी बनवा मसालेदार आणि कुरकुरीत Prawns Rava Fry