उरलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मऊसर इडली
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात भात जास्त झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्याच्यापासून फोडणीचा भात किंवा लेमन राईस बनवला जातो. तर काही लोक शिल्लक राहिलेला भात फेकून देतात. मात्र असे न करता शिल्लक राहिलेल्या भातापासून तुम्ही मऊसर इडली बनवू शकता. घरात लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे इडली सांबार. इडली आणि साऊथ इंडियन पद्धतीमध्ये बनवलेले सांबर चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय लहान मुलांच्या डब्यात किंवा बाहेर फिरायला जाताना तुम्ही शिल्लक राहिलेल्या भातापासून इडली बनवू शकता. चला तर जाणून घेऊया इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सँडविच बनवताना ब्रेडला लावा ‘हा’ हेल्दी पदार्थ, भासणार नाही मेयोनिज किंवा सॉसची गरज
Sunday होईल आणखीनच मजेदार! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा बटाटा सँडविच, नोट करा रेसिपी