Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gobi Manchurian Recipe : फ्लॉवरचे कुरकुरीत मंचुरियन खाल्ले आहेत का? नोट करा रेसिपी

Recipe : भारतात इंडो-चायनीज लव्हर्स फार आहेत. आपण स्ट्रीटवरील फेमस कोबी मंचुरियन तर बऱ्याचदा खाल्ले असतील. पण तुम्ही कधी फ्लॉवरचे कुरकुरीत मंचुरियन ट्राय केले आहेत का?

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 24, 2025 | 10:38 AM
Gobi Manchurian Recipe : फ्लॉवरचे कुरकुरीत मंचुरियन खाल्ले आहेत का? नोट करा रेसिपी

Gobi Manchurian Recipe : फ्लॉवरचे कुरकुरीत मंचुरियन खाल्ले आहेत का? नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:
  • चायनीज लव्हर्ससाठी खास आजची रेसिपी घरी ट्राय करायलाच हवी.
  • फ्लॉवरची भाजी खायला आवडत नसल्यास तुम्ही त्याचे कुरकुरीत मंचुरियन तयार करू शकता.
  • संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा पार्टीसाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय ठरेल.
चायनीज पदार्थ भारतीयांच्या चवीप्रमाणे बदलले गेले आणि त्यातूनच जन्म झाला इंडो-चायनीज पदार्थांचा. त्यामधील सर्वात लोकप्रिय, सगळ्यांच्या आवडीचा आणि स्ट्रीट फूडमध्ये हमखास दिसणारा पदार्थ म्हणजे फ्लॉवर मंचुरियन. कुरकुरीत तळलेले फुलकोबीचे तुकडे, त्यावर घमघमीत सॉस, सोया सॉस, लाल तिखट, आले-लसूण यांचा जबरदस्त तडका… त्यामुळे फ्लॉवर मंचुरियनची चव अगदी वेगळीच लागते.

एका फोटोने केला घात! नदीकिनारी फोटोशूट करत होती महिला, तितक्यात लाट आली अन्… घटनेचा लाइव्ह Video Viral

आजकाल हॉटेलमध्ये, ढाब्यावर किंवा चायनीज स्टॉलवर फ्लॉवर मंचुरियन हमखास मिळतो. पण तोच चविष्ट गोबी मंचुरियन तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. स्वच्छता, तेलाचा योग्य वापर आणि ताज्या भाज्यांमुळे घरचा फ्लॉवर मंचुरियन आरोग्यदायीही ठरतो. फ्लॉवर मंचुरियन ड्राय आणि ग्रेवी अशा दोन प्रकारात बनवता येतो. पार्टी, किटी पार्टी, वाढदिवस किंवा संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया घरगुती स्टाईल फ्लॉवर मंचुरियनची रेसिपी, जी खाणाऱ्याला हॉटेलची आठवण करून देईल.

 साहित्य

मंचुरियन तळण्यासाठी 

  • फ्लॉवर – 1 मध्यम (फ्लोरेट्स करून उकडलेले)
  • मैदा – 4 टेबलस्पून
  • कॉर्नफ्लोअर – 3 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – तळण्यासाठी
 सॉससाठी
  • तेल – 2 टेबलस्पून
  • लसूण बारीक चिरलेला – 1 टेबलस्पून
  • आले बारीक चिरलेले – 1 टीस्पून
  • हिरवी मिरची – 1-2 (चिरलेली)
  • कांदा – 1 मध्यम (चौकोनी कापलेला)
  • शिमला मिरची – 1/2 कप
  • सोया सॉस – 1 टेबलस्पून
  • चिली सॉस – 1 टेबलस्पून
  • टोमॅटो केचप – 1 टेबलस्पून
  • व्हिनेगर – 1 टीस्पून
  • कॉर्नफ्लोअर – 1 टीस्पून (पाण्यात मिसळलेले)
  • मीठ – चवीनुसार
  • स्प्रिंग ओनियन– सजावटीसाठी
पहिल्यांदाच झालं असावं! मुंगूसाला मारताच विजयाचा आनंद साजरा करू लागला किंग कोब्रा, असा नाचला की सर्व पाहतच राहिले; Video Viral

कृती

  • यासाठी प्रथम फ्लॉवरचे तुकडे गरम पाण्यात मीठ घालून 5 मिनिटे उकडून घ्या आणि पाणी निथळून ठेवा.
  • एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, लाल तिखट, आले-लसूण पेस्ट आणि पाणी घालून घट्ट पीठ तयार करा.
  • फ्लॉवरचे तुकडे या पिठात घोळवून गरम तेलात सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात आले, लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्या.
  • त्यात कांदा आणि शिमला मिरची घालून 1-2 मिनिटे उच्च आचेवर परतून घ्या.
  • आता सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप, व्हिनेगर घालून मिक्स करा.
  • कॉर्नफ्लोअरचे पाणी घालून सॉस थोडा घट्ट होऊ द्या.
  • शेवटी तळलेले फ्लॉवरचे फ्लॉवरचे तुकडे घालून सगळे नीट मिसळा.
  • वरून स्प्रिंग ओनियन घालून गरमागरम सर्व्ह करा.
  • फ्लॉवरचे मंचुरियन ड्राय प्रकार नूडल्स किंवा फ्राईड राईससोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.
  • घरच्या घरी बनवलेला हे चविष्ट फ्लॉवरचे मंचुरियन नक्की ट्राय करा आणि कुटुंबीयांसोबत आनंद घ्या!

Web Title: How to make gobi manchurian at home perfect recipe for starters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • marathi recipe
  • street food

संबंधित बातम्या

Recipe : 10 मिनिटांत तयार करा स्ट्रीट स्टाईल ‘दही पूरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
1

Recipe : 10 मिनिटांत तयार करा स्ट्रीट स्टाईल ‘दही पूरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा कॅफे स्टाईल ‘माॅकटेल’, चवीसोबतच शरीरालाही ठेवेल हायड्रेट
2

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा कॅफे स्टाईल ‘माॅकटेल’, चवीसोबतच शरीरालाही ठेवेल हायड्रेट

साधी डिश पण मजेदार चव; घरी बनवा पंजाबी स्टाईल ‘दाल मखनी’, चव अशी की सर्वच होतील खुश
3

साधी डिश पण मजेदार चव; घरी बनवा पंजाबी स्टाईल ‘दाल मखनी’, चव अशी की सर्वच होतील खुश

Summer Special : कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘आमपापड’, ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय
4

Summer Special : कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘आमपापड’, ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.