Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहा बनवताना मिक्स करा किचनमधील 5 पदार्थ, अमृतापेक्षाही लागेल चविष्ट विसराल नॉर्मल Tea

Masala Tea Recipe: जर तुम्ही हिवाळ्यात चहा बनवणार असाल तर त्यात या 5 गोष्टी टाका म्हणजे अमृत बनेल. हिवाळ्यात रोग तुम्हाला स्पर्श करणार नाही. मसाला चहा बनविण्याची रेसिपी

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 13, 2024 | 04:51 PM
मसाला चहा कसा बनवावा

मसाला चहा कसा बनवावा

Follow Us
Close
Follow Us:

हळूहळू थंडीला आता सुरूवात झाली आहे. थंड हवामान खाद्यप्रेमींसाठी वरदानापेक्षा कमी नसले तरी, ज्यांना वारंवार थंडीचा त्रास होतो त्यांच्यासाठी ते धोकादायकदेखील आहे. चवदार मसाला चहा पिऊन तुम्ही केवळ विषाणूजन्य, सर्दी किंवा अ‍ॅलर्जीमुळे होणाऱ्या समस्यांनाच अलविदा म्हणू शकत नाही तर कामानंतरच्या थकव्यालाही अलविदा करू शकता. अर्थात आम्ही मसाला चहाबद्दल बोलत आहोत. 

लवंग, तमालपत्र, तुळशीची पाने, ओवा, काळी मिरी आणि आलं चहामध्ये मिक्स करणे खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार या मसाल्यांचा वापर करून बनवलेला चहा हिवाळ्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. हा चहा केवळ चविष्टच नाही तर शरीराच्या आत होणारे संक्रमण हाणून पाडण्यासाठी आणि शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरतो. कसा बनवावा घरीच मसाला चहा, जाणून घ्या रेसिपी आणि मसाला चहाचे आरोग्यासाठी काय फायदे होतात त्याबाबत माहिती (फोटो सौजन्य – iStock) 

मसाला चहाची रेसिपी

साखर आणि चहाची पाने उकळत्या पाण्यात मिक्स करा आणि त्यात आलं, काळी मिरी, ओवा, तमालपत्र आणि लवंग एकत्र मिक्स करून जास्त वेळ उकळू द्या. त्यातील घटक व्यवस्थित पाण्यात मिसळतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मसाल्यांचा वापर करून ब्लॅक टी किंवा दुधाचा चहा बनवू शकता. या मसाला चहामुळे तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती हमखास वाढण्यास मदत मिळते. जाणून घेऊया या मसाल्यांचे फायदे नक्की काय आहेत आणि याचा शरीराला कसा फायदा मिळतो 

दिवसभरात किती वेळा चहा पिणे योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

मसाल्यांचे फायदे 

  • तमालपत्राचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. तमालपत्रात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. मेटाबॉलिज्म वाढते आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते. अपचन आणि गॅस संबंधित समस्या दूर होतात
  • त्याच वेळी, काळ्या मिरीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. काळी मिरी आणि लवंगामध्ये असलेले युजेनॉल खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करते
  • गाढवाला गुळाची चव काय? अशी म्हण मराठीत आहे. तसंच आल्याशिवाय चहा हा चांगला लागतच नाही असं म्हणणारी माणसंही खूप दिसतील. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे तत्व असते, जे ताजेपणासोबतच शरीराला उबदारपणा देते. आल्याचा स्वभाव उष्ण असतो. याचे सेवन केल्याने शरीराला जास्त थंडी लागत नाही 
  • ओव्याचा चहा नियमित पिण्याने संसर्गाशी लढण्यास मदत होते, जे हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे. ओव्याची प्रकृती ही उष्ण असते. ओव्यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात
दैनंदिन आहारात दुधाचा चहा पिण्याऐवजी नियमित प्या मॅचा बोबा चहा, शरीराला होतील आशचर्यकारक फायदे

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How to make healthy masala tea with mixing of tulsi black pepper bay leaf in tea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 04:51 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral
1

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा
2

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा

Brush केल्या-केल्या चहा पिताय? मग जरा थांबाच! अजिबात करू नका ‘ही’ चूक होईल, मोठे नुकसान
3

Brush केल्या-केल्या चहा पिताय? मग जरा थांबाच! अजिबात करू नका ‘ही’ चूक होईल, मोठे नुकसान

Bladder Stone Removal: सतत टपकतेय लघवी, धार मात्र कमकुवत; म्हणजेच ब्लॅडरमध्ये अडकलाय कचरा, ‘असा’ करा स्वच्छ
4

Bladder Stone Removal: सतत टपकतेय लघवी, धार मात्र कमकुवत; म्हणजेच ब्लॅडरमध्ये अडकलाय कचरा, ‘असा’ करा स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.