Recipe : हिमाचलची फेमस डिश ‘सिद्दू’ खाल्ली आहे का? हिवाळ्यात शरीराला देईल एनर्जी; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Himachal Famous Dish Siddu Recipe : हिवाळ्यात हिमाचलची ही डिश शरीरासाठी फायद्याची ठरते. गव्हाच्या पिठात स्टफिंग भरून वाफवून याला तयार केले जाते आणि मग वरून तुपाची धार सोडली जाते.
सिद्दू हा भारतातील हिमाचल प्रदेशातील एक पारंपारिक पदार्थ आहे जो गव्हाच्या पिठापासून तयार केला जातो. यात मसालेदार स्टफिंग भरून झणझणीत चटणीसह याला खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण भारताच्या अनेक भागात ही डिश फार वेगाने लोकप्रिय होऊ लागली आहे. थंडीच्या दिवसांत ते ही वाफवलेली गरमा गरम डिश मनाला वेगळच सुख देऊन जाते. तुम्ही आजवर जर ही डिश जर कधी खाल्ली नसेल तर यावेळी तुम्ही घरीच बनवून या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. चविष्ट असण्यासोबतच, ही डिश आरोग्यदायी देखील आहे कारण ती तेलाऐवजी वाफेवर शिजवली जाते. सिद्दू अनेक प्रकारे बनवला जातो. पण आज आम्ही तुम्हाला मसूर सिद्दूची रेसिपी सांगणार आहोत. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
सिद्दू बनवण्यासाठी सर्वप्रथम प्रथम एका भांड्यात पीठ, मीठ आणि यीस्ट एकत्र करा आणि चांगले मिसळा. थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.
मळलेल्या पिठाला झाकून १ तास बाजूला ठेवून द्या. असं केल्याने पीठ फुगून दुप्पट होते.
आता स्टफिंगसाठी एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले आणि बडीशेप घाला आणि परतून घ्या. कोथिंबीरची पाने आणि मसाले घाला आणि चांगले मिसळा.
हे सर्व साहित्य मसूर डाळीसह मिक्सरमध्ये बारीक करा. मिश्रण एका प्लेटमध्ये ठेवा आणि थंड होऊ द्या.
आता, सिद्दू तयार करण्यासाठी, पिठाचे मोठे गोळे करा. प्रत्येक गोळ्याच्या आत तयार डाळीची स्टफिंग भरा आणि याला अंडाकार सिद्दूसारखा आकार द्या.
याला शिजवण्यासाठी तेल वापरण्याची गरज नाही. ते वाफवलेले आहे, म्हणून स्टीमरमध्ये पाणी गरम करा.
सिद्दू स्टीमरमध्ये ठेवा, झाकण ठेवा आणि १५-२० मिनिटे शिजू द्या.
सिद्दू शिजला की, त्यावर तूप किंवा तेल लावा आणि गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा.
सिद्दू ही डिश पुदिन्याची चटणी किंवा लाल तिखट चटणीसोबत खणयासाठी सर्व्ह केली जाते.
Web Title: How to make himachal famous dish siddu at home recipe in marathi