
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही स्पेशल हवं असत. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थांच्या सगळ्यांची इच्छा होते. जगभरात साऊथ इंडियन पदार्थ प्रसिद्ध आहे. या पदार्थांची चव कायमच जिभेवर रेंगाळते. इडली, डोसा, मेदुवडा, आप्पे इत्यादी अणे पदार्थ कायमच नाश्त्यात बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये साऊथ इंडियन स्टाईल बेन्ने डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा डोसा घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. सकाळच्या नाश्त्यात कायमच बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावेत. बेन्ने डोसा आणि खोबऱ्याची चटणी हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागते. डोसा किंवा इडली बनवण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालावी लागते. पण बेन्ने डोसा बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजत घालण्याची कोणतीही आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया साऊथ इंडियन स्टाईल बेन्ने डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Winter Special Recipe: १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक गाजर पचडी, चवीसोबत शरीराला मिळेल भरपूर पोषण