
हेल्दी टेस्टी गुळाचा पराठा
हिवाळ्यात शरीराला पौष्टिक आणि हेल्दी आहाराची आवश्कयता असते. त्यामुळे आहारात बदल करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गुळाचे सेवन करावे. नैसर्गिक गोडवा असलेले गूळ जेवणातील पदार्थांसह औषधासाठी सुद्धा वापरले जाते. खीर, शिरा, लापशी किंवा इतर गोड पदार्थ बनवण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. गुळाचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होते. त्यामुळे तुम्ही कोमट पाण्यासोबत गुळाचे सेवन करू शकता. मधुमेह किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी साखरेचे सेवन करण्याऐवजी गुळाचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. गुळापासून बनवलेला लाडू, चिक्की किंवा इतर पदार्थ तुम्ही खाल्ले असतील पण कधी गुळाचा पराठा खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर ही रेसिपी नक्की बनवून पहा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गुळाचा पराठा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा