सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम गाजर सूप
राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडी पडायला सुरुवात झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील ऊर्जा आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. सतत सर्दी, खोकला इत्यादी आजार वाढू लागतात. या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. थंडीमध्ये वातावरणात गारवा वाढल्यामुळे शरीराला ऊब मिळण्यासाठी आहारात गरम आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही नाश्त्यामध्ये गाजर सूप बनवू शकता. थंडीमध्ये गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. शिवाय गाजर खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये सोप्या पद्धतीत गाजर सूप कसे बनवावे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सूप झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा