१५ मिनिटांमध्ये घरातील लहान मुलांसाठी झटपट बनवा गूळ-ज्वारीचा पौष्टिक केक
घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे केक. वाढदिवसाच्या दिवशी किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी घरात केक आणला जातो. केक पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेव्हरचे केक उपलब्ध आहेत. चॉकलेट केक, स्ट्रॉबेरी केक, बटरस्कॉच केक इत्यादी फ्लेव्हरचे केक उपलब्ध असतात. पण नेहमीच विकतचा केक आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेला केक खावा. विकत मिळणाऱ्या केकमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर असते. अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे शरीरात मधुमेह वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी गूळ ज्वारीचा केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा केक घाईगडबडीच्या वेळी सुद्धा झटपट तयार होतो. याशिवाय मधुमेहाचे रुग्ण गुळाचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया गूळ ज्वारीचा केक बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊ-मोकळा शेवयांचा उपमा, अजिबात होणार नाही चिकट