लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा शेवग्याचे सूप
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय नाजूक असते. त्यामुळे वाढत्या मुलांना कायमच निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार द्यावा. पण बऱ्याचदा मुलांना सकाळच्या नाश्त्यात बाहेरील विकतचे तेलकट पदार्थ, पिझ्झा, पास्ता खाण्यास हवा असतो. पण सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात शेवग्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगा लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. शेवग्याच्या शेंगाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील हाडे कायमच मजबूत राहतील. याशिवाय शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, विटामिन सी, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. लहान मुलांची ताकद वाढवण्यासाठी मुलांना कायमच शेवग्याचे सूप पिण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया शेवग्याचे सूप बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य: Pinterest)
पितृपक्षात नैवेद्यासाठी झटपट बनवा आंबट गोड आमसुलाची चटणी, चवीसोबत आरोग्यासाठी ठरेल गुणकारी