
पचनाच्या समस्या होतील कायमच्या गायब! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रसदार आवळ्याचे पाचक
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. दैनंदिन आहारात सतत तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते. अशावेळी आहारात नियमित आवळ्याचे सेवन करावे. आवळ्याच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये जीवनसत्त्व सी, अँटी ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. बिघडलेली पचनक्रिया सुधरण्यासाठी कोमट पाण्यात आवळ्याची पावडर मिक्स करून प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील.याशिवाय पचनक्रिया मजबूत राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आवळ्याचे पाचक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर नियमित एक पाचक गोळी खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच पोटातील वायू सुद्धा कमी होतील. आवळा खाल्ल्यामुळे भूक वाढते आणि त्वचा कायमच ताजीतवानी राहते. केसांच्या वाढीसाठी आवळा अतिशय प्रभावी ठरतो. चला तर जाणून घेऊया आवळ्याचे पाचक बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)