
माधुरी दीक्षितने सांगितलेली कांदाभजीची रेसिपी नक्की बनवून पहा
पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्यानंतर पहिली आठवण कांदा भजीची येते. कांदा भजीसोबत गरमागरम चहा असेल तर आणखीनच मस्त. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक कांदाभजी सर्वच घरांमध्ये बनवली जाते. कांदाभजीसोबत इतर वेगवेगळ्या पदर्थांपासून बनवललेया भजी सुद्धा बनवल्या जातात. कांदाभजी खाण्याची इच्छा झाल्यानंतर अनेक लोक ती बाहेरून विकत घेऊन येतात, पण सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. घरी बनवलेल्या भजी आरोग्यासाठी सुद्धा हेल्दी असतात.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने सुद्धा आपल्या इंस्टाग्राम पेजवरून कांदा भजी घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवायची याची सोपी शेअर केली आहे. यामध्ये तिने कांदाभजी कुरकुरीत होण्यासाठी कोणते पदार्थ वापरावे, याबद्दल सांगितलं आहे. चला तर जाणून घेऊया माधुरी दीक्षितने सांगितलेली कांदा भजीची रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)