
हिवाळ्यात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरी बनवा गरमागरम हिरव्या मुगाचे सूप, शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा
Soup Recipe: राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे थंड वारे वाहू लागले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि आरोग्य बिघडते. शरीरातील उबदारपणा टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सूप प्यायले जाते. टोमॅटो, पालक आणि इतर मिक्स भाज्यांचा वापर करून सूप बनवले जाते. पण आज आम्ही तुम्हाला हिरव्या मुगाचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सूप चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये हाडांना आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी हिरव्या मुगाचे सूप पिणे फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)