
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीची Lemon Coriander Maggi
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मॅगी खायला खूप जास्त आवडते. शाळेच्या डब्यासाठी किंवा भूक लागल्यानंतर सगळ्यात आधी मॅगीची आठवण होते. घाईच्या वेळी नाश्त्यात काय बनवावं बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी मॅगी आणून लगेच बनवली जाते. पण कायमच साधी मॅगी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये लेमन कोरिएंडर मॅगी बनवू शकता. लहान मुलांना कोथिंबीर खायला आवडत नाही. जेवणात टाकलेली कोथिंबीर कायमच बाजूला काढून टाकली जाते. हा पदार्थ केवळ चवीसाठी नाहीतर पोट भरण्यासाठी सुद्धा खाल्ला जातो. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, पराठा, शिरा इत्यादी पदार्थ खायचा सगळ्यांचं कंटाळा येतो. लेमन कोरिएंडर मॅगी तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू देऊ शकता. चला तर जाणून घेऊया लेमन कोरिएंडर मॅगी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)