साथीच्या आजारांपासून कायमच राहाल लांब! पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा झणझणीत लसूण लोणचं
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंड वातावरणात शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यातील अतिशय गुणकारी पदार्थ म्हणजे लसूण. लसूण शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. लसूणमध्ये असलेले गुणकारी घटक शरीरात उष्णता टिकवून ठेवतात. थंडीच्या दिवसांमध्ये लसूण काढा किंवा लसूणपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लसूण लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात. लसूण खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, पचन सुधारतो, कोलेस्ट्रॉल आणि युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते. शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे अनेक आजारांपासून शरीराचा बचाव करतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लसूण चावून खाल्ल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातील. चला तर जाणून घेऊया लसूण लोणचं बनवण्याची सोपी कृती. (फोटो सौजन्य – pinterest)






