
कमीत कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'आंब्याचा स्वादिष्ट जाम'
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात. चवीला गोड रसाळ आंबे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतात. अंब्याचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय पिकलेल्या आंब्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आमरस, आंबा पोळी, आंब्याची साठ, आंब्याचा रस इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला कमीत कमी साहित्यामध्ये आंब्याचा चविष्ट जाम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बाजारात वेगवेगळ्या फळांचे जाम उपलब्ध आहेत. पण केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करून जाम बनवण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये आंब्याचा जाम बनवू शकता. चला तर जाणून घेऊया आंब्याचा जाम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)