आंबटगोड कच्च्या कैरीपासून बनवा चवदार कैरीच्या वड्या
कडक उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा जाणवणे, चिडचिड होणे इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. उष्णता वाढल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे आहारात थंड पदार्थ, ताक, दही, सरबत इत्यादी पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणावर कच्च्या कैरी उपलब्ध असतात. कैरीपासून कैरीचा तक्कू, मेथांबा, साखरअंबा, गुळांबा इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला कच्च्या कैरीपासून आंबटगोड वड्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या आंबटगोड वड्या अधिककाळ व्यवस्थित टिकून राहतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कच्ची कैरी खायला खूप आवडते. नेहमीच चॉकटेल, गोळ्या खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही कैरीपासून बनवलेल्या वड्यांचे सेवन करू शकता. जाणून घ्या कैरीच्या आंबटगोड वड्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Punjabi Lassi Recipe: उन्हाळ्यात घरी बनवा मलाईदार पंजाबी लस्सी; उष्माघातापासून करेल बचाव