Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Recipe : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग घरी नक्की बनवा हा आयुर्वेदिक काढा

पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि व्हायरल संसर्गाचा धोका वाढतो. अशा वेळी तुळस, आले आणि इतर मसाल्यांपासून तयार केलेला घरगुती काढा शरीराला उब देण्यास आणि प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2026 | 08:15 PM
Monsoon Recipe : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग घरी नक्की बनवा हा आयुर्वेदिक काढा

Monsoon Recipe : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग घरी नक्की बनवा हा आयुर्वेदिक काढा

Follow Us
Follow Us:
  • तुळस, आले, काळी मिरी आणि दालचिनीपासून हा पौष्टिक काढा तयार होतो.
  • पावसाळ्यात शरीराला उब देण्यासाठी आणि ऋतूतील बदलांशी जुळवून घेण्यासाठी उपयुक्त पर्याय.
  • अवघ्या काही मिनिटांत तयार होणारा हा काढा गरम किंवा कोमट पिणे अधिक फायदेशीर ठरते.
पावसाळा सुरू झाला की हवेतला गारवा आणि आल्हाददायक वातावरण मनाला आनंद देत असले तरी या ऋतूमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप आणि व्हायरल संसर्गाचा धोका वाढतो. बदलते हवामान आणि वाढलेली आर्द्रता यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. अशा वेळी घरच्या घरी तयार केलेला पारंपरिक काढा शरीराला उब देण्यास आणि ऋतुमानाशी जुळवून घेण्यास मदत करतो.

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध काही मसाले केवळ चवीसाठीच नव्हे तर त्यांच्या गुणधर्मांसाठीही ओळखले जातात. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि अवघ्या काही मिनिटांत तयार होते. गोडवा आवडत असल्यास शेवटी मध किंवा गूळ घालू शकता. मात्र मध नेहमी काढा थोडा कोमट झाल्यावरच घालावा.

साहित्य

  • २ कप पाणी
  • ८ ते १० तुळशीची पाने
  • १ इंच आले (ठेचलेले)
  • ४ ते ५ काळी मिरी
  • २ लवंगा
  • १ छोटा दालचिनीचा तुकडा
  • ¼ टीस्पून हळद
  • १ टीस्पून गूळ किंवा १ टीस्पून मध (ऑप्शनल)
  • १ टीस्पून लिंबाचा रस (ऐच्छिक)
Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’

कृती

  • एका पातेल्यात २ कप पाणी गरम करून त्यात आले, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी घाला.
  • मिश्रण ५ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या, जेणेकरून मसाल्यांचा अर्क पाण्यात उतरू लागेल.
  • आता त्यात तुळशीची पाने आणि हळद घालून आणखी ५ ते ७ मिनिटे उकळा.
  • पाणी साधारण अर्धे राहिल्यावर गॅस बंद करा.
  • काढा गाळून कपात ओतून घ्या.
  • थोडा कोमट झाल्यावर त्यात गूळ किंवा मध मिसळा. आवडत असल्यास काही थेंब लिंबाचा रस घाला.
  • गरम किंवा कोमट असतानाच हा मान्सून स्पेशल काढा प्या.
  • ताजा काढा बनवून लगेच पिणे अधिक चांगले.
 

Web Title: How to make monsoon special herbal kadha for immunity at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.