Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Raw Banana Tuk Recipe : कच्च्या केळ्यापासून बनवली जाणारी ही कुरकुरीत डिश चवीला फार छान लागते. वरण-भातासोबत तुम्ही हा पदार्थ सर्व्ह करु शकता. शिवाय घरी आलेल्या पाहुण्यांनाही काहीतरी वेगळं करुन खायला घालायचं असल्यास स्नॅक्स म्हणून ही रेसिपी परफेक्ट ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 30, 2026 | 09:36 AM
Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत 'टूक', संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत 'टूक', संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • टूक हा एक प्रसिद्ध सिंधी पदार्थ आहे.
  • बहुतांश बटाट्यापासून हा पदार्थ तयार केला जातो.
  • पण आपण कच्च्या केळ्यापासून ही डिश कशी बनवायची ते जाणून घेत आहोत.
कच्च्या केळ्यापासून बनवलेली बनाना टुक ही एक पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी आहे. साध्या मसाल्यांमध्ये तयार होणारी ही रेसिपी खमंग, कुरकुरीत आणि तिखट-खारट चवीमुळे जेवणाची रंगत वाढवते. कच्च्या केळ्यामध्ये भरपूर फायबर, पोटॅशियम आणि आवश्यक पोषक घटक असल्याने ही भाजी चवदार तर असतेच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

उपवासाच्या दिवसांव्यतिरिक्त रोजच्या जेवणातही ही भाजी आवडीने खाल्ली जाते. गरमागरम पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत कच्च्या केळ्याची तुक अप्रतिम लागते. कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्ही कधीही सहज बनवून खाऊ शकता.

साहित्य

  • २ कच्ची केळी
  • २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • १ टेबलस्पून बेसन
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून धणे-जिरे पूड
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • १/२ टीस्पून ओवा
  • चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ
  • १ टेबलस्पून लिंबाचा रस
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • तळण्यासाठी तेल
Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

कृती

  • सर्वप्रथम कच्ची केळी स्वच्छ धुऊन त्यांची साल काढा. त्यानंतर जाडसर गोल किंवा लांबट तुकडे करून ५ ते ७ मिनिटे हलके उकळून घ्या. उकडलेले तुकडे पूर्णपणे निथळून थंड होऊ द्या.
  • एका भांड्यात तांदळाचे पीठ, बेसन, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, ओवा, हिंग, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर एकत्र मिसळा. आवश्यक असल्यास एक-दोन चमचे पाणी घालून घट्ट मसाला तयार करा.
  • या मसाल्यामध्ये केळ्याचे तुकडे घालून प्रत्येक तुकड्यावर मसाला व्यवस्थित लागेल असे हलक्या हाताने मिक्स करा. मसाला तुकड्यांवर १० मिनिटे मुरू द्या.
  • तवा गरम करून त्यावर थोडे तेल सोडा. मसाला लावलेले केळ्याचे तुकडे तव्यावर एकाच थरात ठेवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा. आवश्यकतेनुसार थोडे थोडे तेल सोडा.
  • तयार कच्च्या केळ्याची टुक गरमागरम सर्व्ह करा. याला तुम्ही हिरवी चटणी, दही किंवा साध्या वरण-भातासोबतही खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.
  • बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेली ही पारंपरिक रेसिपी प्रत्येक घासात वेगळी चव अनुभवायला लावते.

Web Title: How to make raw banana tuk at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • banana benefits
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
1

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.