
शिराळ्याच्या साली फेकून देत असाल तर थांबा! जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार सालींची चटणी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना शिराळ्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही. भाजी पाहिल्यानंतर नाक मुरडतात. पण गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या भाजीचे कधीतरी आहारात सेवन करावे. भाजीच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. शिराळी आणल्यानंतर भाजी बनवताना त्याच्या वरील साल काढून फेकून दिली जाते. पण याच सालींचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चटकदार चटणी बनवू शकता. शिराळ्याच्या सालींची चटणी कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय गरमागरम भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. जेवणात तोंडू लावण्यासाठी प्रत्येकाला काहींना काही हवे असते. अशावेळी बाहेरील विकतच्या तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या खमंग चटणीचे सेवन करावे. शिराळ्याच्या सालींची चटणी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते. सालींची चटणी लहान मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता. यामुळे मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जातील. चला तर जाणून घेऊया शिराळ्याच्या सालींची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
डब्यासाठी स्पेशल थंडीत घरी बनवा खमंग आणि हेल्दी ‘मटर पराठा’, रेसिपी आहे फार सोपी