
लहान मुलांच्या डब्यासाठी अशा पद्धतीने बनवा चविष्ट शेंगदाण्याची पोळी
लहान मुलांना नेहमी नाश्त्यामध्ये आणि डब्यात काय खायला द्यावं हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अनेकदा मुलं सतत बाहेरचे पदार्थ खायला मागता. बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम हळूहळू लहान मुलांवर सुद्धा दिसू लागला आहे. पिझ्झा, बर्गर इत्यादी फास्ट फूड मुलांना आवडू लागल्यामुळे घरी बनवलेल्या पदार्थाची चव मुलांना आवडतच नाही. अशावेळी मुलांना डब्यात खायला काय द्यावं हा प्रश्न पडतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांच्या डब्यात तुम्ही शेंगदाण्याची पोळी बनवून देऊ शकता. शेंगदाणे खाल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता कमी होऊन आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया शेंगदाण्याची पोळी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)