शिंगाड्याच्या पिठाचा स्क्रब बनवण्याची पद्धत:
चमकदार आणि सुंदर त्वचा सर्वच महिलांना हवी असते. गोरीपान आणि मऊ त्वचेसाठी महिला फेशिअल, क्लीनअप, स्क्रबिंग इत्यादी अनेक गोष्टी करतात. हे सर्व उपाय केल्यानंतर काही दिवसांसाठी त्वचा खूप सुंदर आणि चमकदार होते. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. फेसमास्क, फेसस्क्रब, फेशियल इत्यादी गोष्टी केल्यानंतर त्वचा चमकदार होते असे अनेकांना वाटते, पण असे नाही. त्वचेला आतून पोषण फार गरजेचे आहे. त्यामुळे रोजच्या आहारात सात्विक आहार, भरपूर पाणी पिणे, फळांचा रस इत्यादी गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवर ग्लो येतो. त्वचेवर ग्लो आल्यानंतर चेहरा अधिक सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी सुरुवात होते.
वातावरणातील बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो.धूळ, माती,प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींमुळे त्वचा काळवंडून जाते. काळा पडलेला त्वचेचा रंग सुधारण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चेहरा तेलकट आणि चिकट होऊन जातो. चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा झाल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. यामुळे चेहऱ्यावर मृत त्वचा जमा होऊन चेहरा खराब दिसू लागतो. खराब झालेला चेहरा उजळ्वण्यासाठी तुम्ही स्क्रबिंगची मदत घेऊ शकता. स्क्रबिंग केल्यामुळे चेहऱ्यावर मृत पेशी निघून जाऊन त्वचा चमकदार आणि सुंदर होईल. आज आम्ही तुम्हाला शिंगाड्याच्या पिठाचा वापर करून स्क्रबिंग फेसपॅक कसा तयार करायचा, याची सोपी पद्धत सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चेहऱ्यावरील चट्ट्यापासून त्रासले आहात? ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर
हे देखील वाचा: महिनाभर नाश्ता नाही केला तर आरोग्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या