कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फळ (फोटो सौजन्य - iStock)
रक्तात एलडीएल कोलेस्टेरॉल असणे महत्त्वाचे आहे. परंतु जर त्याचे प्रमाण 100 mg/dL पेक्षा जास्त असेल तर नसांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची परिस्थिती उद्भवू शकते.
LDL कोलेस्टेरॉल वाढले आहे की नाही हे कसे ओळखावे? शरीरात घाणेरडी चरबी वाढली की अनेक चिन्हे दिसू लागतात. याचा अनेकांना अंदाज नसतो. मात्र यामध्ये प्रामुख्याने मळमळ, शब्द स्पष्टपणे उच्चारण्यात अडचण, थकवा, हात-पाय सुन्न होणे, छातीत दुखणे, थकवा येणे, पापण्यांवर पिवळी चरबी जमा होणे यांचा समावेश होतो. पण यावर एक फळ तुम्हाला सुटका मिळवून देऊ शकते. अनेक अभ्यासात सिद्ध करण्यात आल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या रोजच्या नाश्त्याचा भाग हे फळ करून घेतल्यास नक्कीच फायदा होतो. मात्र त्याआधी कोलेस्ट्रॉलची कारणे जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
कोलेस्ट्रॉल का वाढते?
कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे
शरीरात एलडीएल कोलेस्टेरॉल वाढण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. जिथे खाण्याच्या वाईट सवयीमुळे कोलेस्टेरॉलचे रुपांतर प्लाकमध्ये होते. त्याच वेळी, हेल्दी फूड खाल्ल्याने यापासून मुक्ती मिळण्याची शक्यता असते.
कोलेस्ट्रॉल कमी करणारे फळ
रोज सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. सफरचंद हे पौष्टिकतेने समृद्ध फळ आहे. यामध्ये तांबे, विटामिन के आणि विटामिन ई सोबत 10 टक्के विटामिन सी असते. रोज सफरचंद खाल्ल्याने केवळ कोलेस्ट्रॉलच नाही तर अन्य अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.
दिवसातून 2 सफरचंद खा
सफरचंदाने होईल कोलेस्ट्रोल कमी
2020 मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ब्रिटन आणि इटलीमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की दिवसातून दोन सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर कोलेस्ट्रॉल वाढू द्यायचे नसेल तर सफरचंदाचे सेवन करावे.
जीवघेणे आजार टळतील
निरोगी हृदयासाठी दररोज एक सफरचंद ही चांगली सवय आहे कारण पेक्टिन केवळ कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करत नाही तर सफरचंदातील पॉलिफेनॉल रक्तदाब कमी करण्यास आणि पक्षाघाताचा धोका कमी करण्यास मदत करतात. सफरचंदमध्ये एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असते ज्यामुळे अल्झायमरचा धोकादेखील कमी होतो.