त्वचेवरील चामखीळ चेहऱ्याचा लूक खराब करतायेत? मग आजच करा हे नैसर्गिक उपाय; चामखीळ आपोपच गळून होतील नाहीशे
आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र चेहऱ्यावरचे डाग आणि अन्य समस्या आपली इच्छा पूर्ण होऊ देत नाही. त्यातही चेहऱ्यावरील डाग अनेक कॉस्मॅटिकसचा वापर करून लपवता अथवा घालवता येतात पण चेहऱ्यावर येणाऱ्या लहान गाठींचं काय करायचं? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो पण यावर योग्य उपाय कुणालाही ठाऊक नाही. चेहऱ्यावरील या गाठी ज्यांना आपण “चामखीळ” म्हणून ओळखतो या त्रासदायक नसल्या तरी मान, चेहरा किंवा हात यांसारख्या उघड्या भागांवर असेल, तर ते दिसायला खटकते आणि अनेकांना लाजिरवाणीसुद्धा वाटते. चामखीळ कोणताही गंभीर आजार नसला तरी ती वेळेवर योग्य काळजी न घेतल्यास त्वचेवर इतर ठिकाणीही पसरू शकते.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे थकवा आणि झोपच नाही तर असू शकते ‘या’ आजरांचे लक्षण; वेळीच जाणून घ्या
चामखीळ खाजवली, कुरतडली तर ती अधिक उठून दिसते आणि त्या जागी जळजळ, आग होऊ शकते. बाजारात यासाठी विविध औषधी क्रीम्स व शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत, पण काही घरगुती, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. आज आपण या लेखात नैसर्गिक उपायांनी चामखीळ नष्ट कशी करायची किंवा यातून सुटका कशी मिळवायची ते जाणून घेणार आहोत.
कांद्याचा रस
आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असणारा आणि प्रत्येक भाजीत वापरला जाणारा कांदा केवळ भाजीची चवच वाढवत नाही, तर त्यात अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. कांद्याचा रस चामखिळीवर लावल्यास ती हळूहळू सुकते व गळून जाते. एक चमचा रस काढा, कापसाच्या मदतीने गाठ असलेल्या भागावर लावा. शक्य असेल तर रात्री झोपताना लावून ठेवा आणि सकाळी सौम्य साबणाने धुवा. आठवड्यातून २–३ वेळा हा उपाय केल्याने परिणाम जाणवू लागतो. रसात थोडी हळद मिसळल्यास त्वचेला अधिक संरक्षण मिळते.
लसूण
लसूणामध्ये सल्फरयुक्त संयुगे असतात, जी त्वचावरील जंतू आणि बुरशीच्या संसर्गावर प्रभावी असतात. लसूणाची पाकळी चिरून ती थेट चामखिळीवर चोळा किंवा पेस्ट करून लावा. १५–२० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा उपाय रोज दोन वेळा केल्यास काही दिवसांत फरक दिसू लागतो.
केळीची साल
बहुतेक जण केळीची साल फेकून देतात, पण तिच्यात एंझाइम्स असतात जे त्वचा मऊ करून चामखीळ नष्ट करण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी सालीची आतील बाजू चामखिळीवर ठेवा आणि हलकं कपडं किंवा पट्टी बांधा. सलग काही आठवडे हा उपाय केल्यास चामखिळी नैसर्गिकरित्या गळते.
सफरचंदाचा व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
या व्हिनेगरमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे त्वचेचा pH बॅलन्स सुधारतात. थोडा व्हिनेगर कापसात भिजवून चामखिळीवर लावा, आणि त्यावर प्लास्टर लावा. ३०–४५ मिनिटांनी काढून टाका. दिवसातून एकदाच हा उपाय पुरेसा आहे. संवेदनशील त्वचेसाठी व्हिनेगर थोडं पाण्यात मिसळून वापरणं अधिक योग्य.
वरील उपाय कोणताही करताना नियमितपणा आणि संयम गरजेचा आहे. कोणतीही चामखीळ लगेच नाहीशी होत नाही, पण सातत्याने योग्य उपचार केल्यास ती हळूहळू कमी होते आणि त्वचा पूर्ववत सुंदर दिसू लागते. त्वचेला कोणतीही अॅलर्जी होत असल्यास उपाय थांबवावा आणि त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.