घरबसल्या हाडांमध्ये वाढेल Vitamin D! रोजच्या आहारात नेहमीच करा 'या' फळांचे सेवन
वाढत्या वयात शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. कधी हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, हाडं दुखणे, अंग दुखणे, सांध्यांमधील वेदना, थकवा, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, आहारात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.यामुळे काहीवेळा शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर अनेक बदल दिसून येतात. विटामिन डी च्या कमतरतेमुळे हाडांच्या वेदना वाढण्याची शक्यता असते. विटामिन डी मिळवण्यासाठी अनेक लोक सकाळच्या कोवळ्या उन्हात जाऊन बसतात. मात्र याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे,याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात आवळा हे फळ उपलब्ध असत. आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. शरीरात निर्माण झालेली विटामिन सी आणि डी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात आवळ्याचे सेवन करावे. याशिवाय तुम्ही आवळ्याच्या रसाचे किंवा आवळ्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. नियमित आवळ्याचे सेवन केल्यामुळे हाड मजबूत होतात, त्वचा उजळदार होते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
चवीला आंबटगोड असलेली संत्री बाजारात सहज उपलब्ध होतात. संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येते. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली विटामिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात संत्री खावीत. संत्र्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरास विटामिन डी पुरवण्यास मदत करतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी तुम्ही संत्र खाऊ शकता.
केळी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जातात. केळ्यांमध्ये असलेले पोटॅशियम मॅग्नेशियम इत्यादी आवश्यक घटक शरीराला विटामिन डी पुरवतात. त्यामुळे नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर केळ्याचे सेवन करावे. केळी खाल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गॅस, अपचनाची समस्या उद्भवत नाही.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट आणि निरोगी राहते. नारळ पाण्यासोबतच नारळाच्या आतील गराचे सुद्धा सेवन करावे. नारळामध्ये नैसर्गिक फॅट्स आढळून येतात, ज्यामुळे शरीराला विटामिन डी मिळते. याशिवाय तुम्ही सकाळी उठल्यानंतर काहीवेळ सूर्यप्रकाशात बसल्यास फायद्याचे ठरू शकते.